T20 World Cup ENG vs AFG : अफगाणिस्तानची झुंज मोडून काढत इंग्लंडचा पहिला विजय

T20 World Cup 2022 England vs Afghanistan
T20 World Cup 2022 England vs Afghanistanesakal

England Vs Afghanistan T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 च्या सुपर 12 मधील दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव केला. अफगाणिस्तानचे 113 धावांचे माफक आव्हान इंग्लंडने 18.1 षटकात 5 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. इंग्लंडकडून लिम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक 29 धावा केल्या. अफगाणिस्तानने छोट्या टार्गेटमध्येही इंग्लंडला चांगलेच दमवले. त्यांनी इंग्लंडचा निम्मा संघ बाद करत सामना 19 व्या षटकापर्यंत खेचला. यात सर्व गोलंदाजांनी योगदान दिले.

इंग्लडनने पर्थवरील वेगवान गोलंदाजांना पोषक असलेल्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यासमोर अफगाणी फलंदाजांनी संथ सुरूवात केली. मात्र त्यांच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी किंवा भागीदारी रचण्यात यश आले नाही. अखेर अफगाणिस्तानचा डाव 19.4 षटकात 112 धावांवर संपुष्टात आला.

अफगाणिस्तानकडून इब्राहीन झादरान आणि उस्मान घानी यांनी थोडा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मत्र झादरान 32 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. तर उस्मान गाझीने 30 चेंडूत 30 धावा केल्या. इंग्लंडकडून सॅम करनने 10 धावात अफगाणिस्तानचा निम्मा संघ माघारी धाडला. तर मार्क वूड आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

112-10 : सॅम करनचा दमदार मारा,निम्मा संघ केला गारद 

इंग्लंडकडून सॅम करनने 10 धावात अफगाणिस्तानचा निम्मा संघ माघारी धाडला. तर मार्क वूड आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

62-3 : अफगाणिस्तानला मोठा धक्का

सॅम करनने अफगाणिस्तानचा सेट झालेला फलंदाज इब्राहीम झादरानला बाद करत मोठा धक्का दिला. इब्राहीम झादरानने 32 चेंडूत 32 धावा केल्या.

55-2 (10 Ov) : अफगाणिस्तानची संथ सुरूवात 

35-2 : दुसरा सलामीवीर देखील माघारी

बेन स्टोक्सने 17 चेंडूत 7 धावा करत चाचपडत खेळणाऱ्या हझरतुल्ला जझाईला अखेर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

11-1 : अफगाणिस्तानला पहिला धक्का

मार्क वूडने अफगाणिस्तानला तिसऱ्याच षटकात पहिला धक्का दिला. त्याने रेहमानउल्ला गुरबाजला 11 धावांवर बाद केले.

इंग्लंडने नाणेफेक जिंकली 

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com