IND vs ENG : इंग्लंडला आव्हान देण्यात यशस्वी; उपांत्य फेरीतील सामनावीर अक्षर पटेलचे उद्‌गार

T20 World Cup :भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत इंग्लंडचा धुव्वा उडवत टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
t20 world cup 2024 ind vs eng india qualify in final akshar patel semi-final round
t20 world cup 2024 ind vs eng india qualify in final akshar patel semi-final roundSakal
Updated on

जॉर्जटाऊन (गयाना) : भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी मध्यरात्री झालेल्या लढतीत इंग्लंडचा धुव्वा उडवत टी-२० विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल याने २३ धावा देत तीन फलंदाज बाद करीत सामनावीराचा मान संपादन केला.

या लढतीनंतर त्याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे कठीण असते, पण खेळपट्टी गोलंदाजीला साथ देते, हे लक्षात आल्यानंतर जास्त विचार केला नाही. विलक्षण किंवा असामान्य काही करण्याचा प्रयत्न केला नाही. गोलंदाजीच्या मूलभूत बाबींवर लक्ष दिले. त्यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांना आव्हान देता आले.

आमची फलंदाजी झाल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळपट्टीबाबत चर्चा झाली. या खेळपट्टीवर फलंदाजांसमोर आव्हानात्मक परिस्थिती असेल, हे समजले. माझ्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे माहीत होते.

चेंडू बॅटवर सहज येत नसल्यामुळे माझ्या गोलंदाजीवर बॅकफूटवर फलंदाजी केली जाणार नाही, हेही माहीत होते. याकडे विशेष लक्ष देऊन मी साधी योजना बनवली. माझ्या गोलंदाजीवर विविध फटके खेळण्यासाठी फलंदाजांना प्रवृत्त करायचे, असे ठरवले.

पहिल्याच चेंडूवर विकेट मिळेल, असे वाटले नाही, पण योजना यशस्वी झाली. या खेळपट्टीवर चेंडू खाली राहत होते. यामुळे येथे स्वीप, रिव्हर्स स्वीपचे फटके खेळणे सहज शक्य नव्हते, असे अक्षर पटेल पुढे म्हणाला.

खेळपट्टीचा अंदाज आला

मी जेव्हा फलंदाजीला मैदानात आलो, तेव्हा इंग्लंडचे गोलंदाज संथ, हळूवार चेंडू टाकत होते. त्याचवेळी या खेळपट्टीवर फलंदाजांसमोर धावा करण्याचे आव्हान असेल, याचा अंदाज आला. आम्ही १७१ धावा केल्यानंतर इंग्लंडला रोखू शकतो, हे आम्हाला माहीत होते.

आम्ही १० ते १५ धावा अतिरिक्त केल्या. या खेळपट्टीवर सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये इंग्लंडचे फलंदाज आक्रमक फलंदाजी करणार, हेही माहीत होते. त्यांच्याकडून प्रयत्न करण्यात आला, पण त्यांना यश मिळाले नाही, असे अक्षर पटेलने नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com