Virat Kohli: 'मानलं भाऊ'...सुर्यकुमार यादवच्या 'त्या' कमेंट वर विराटचा भन्नाट रिप्लाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

Virat Kohli: 'मानलं भाऊ'...सुर्यकुमार यादवच्या 'त्या' कमेंट वर विराटचा भन्नाट रिप्लाय

भारताने नेदरलँड्सचा 56 धावांनी केला पराभव केला. या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सुर्यकुमार यादव यांनी मोलाची कामगिरी बजावली. रोहित शर्माने 53 धावा केल्या. त्याचवेळी विराट कोहलीने 44 चेंडूत 62 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी केली. या विजयानंतर विराटने खास पोस्ट करत खेळाडूंचे कौतुक केले. मात्र, क्रिकेट जगतात चर्चा आहे ती म्हणजे सुर्यकुमार यादवच्या कमेंटची अन् विराटच्या मराठी रिप्लायची.

सामन्यानंतर विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सामन्यातील काही फोटो पोस्ट करत, “आणखीन एक दमदार निकाल” अशा कॅप्शनसहीत पोस्ट केली. या पोस्टमध्ये चार फोटोंचा समावेश असून कॅप्शननंतर भारतीय झेंड्याचा आणि ताकद दर्शवणाऱ्या दंडांचे इमोजी वापरण्यात आले आहेत. या चार फोटोपैकी एका फोटोमध्ये विरोट आणि सुर्यकुमार दोघे क्रिजवर दिसत आहेत.

दोघांचा फोटो पाहून सुर्यकुमार भलताच खुश झाला त्याने दोघांच्या जोडीला 'सूरवीर' असे भन्नाट नाव सुचवत कमेंट केली. तर त्याची ही प्रतिक्रिया पाहून, विराटने थेट मराठीत आपल्या भावना व्यक्त केल्या.

सूर्यकुमारने दोघांच्या जोडीसाठी दिलेलं नाव पाहून विराटने कमेंटमध्ये आधी हसू आल्याचं दर्शवलं आहे नंतर ‘मानलं भाऊ’ असं म्हणत फायर इमोजी वापरला आहे.

टॅग्स :Rohit SharmaVirat kohli