esakal | T20 World Cup : मॅथ्यू हेडनसह आफ्रिकेचा दिग्गज पाक संघाला देणार धडे
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup : मॅथ्यू हेडनसह आफ्रिकेचा दिग्गज पाक संघाला देणार धडे

T20 World Cup : मॅथ्यू हेडनसह आफ्रिकेचा दिग्गज पाक संघाला देणार धडे

sakal_logo
By
सुशांत जाधव

T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ऑस्ट्रेलियन दिग्गजाची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नव नियुक्त अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर रमीझ राजा यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील मोठी घोषणा केली. युएई आणि ओमनमध्ये रंगणाऱ्या टी-20 वर्ल्डकपवेळी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटर मॅथ्यू हेडन पाकिस्तानच्या संघाला मार्गदर्शन करताना दिसतील.

पाकिस्तान संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा माजी जलदगी गोलंदाज व्हर्नन फिलँडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार युनिस यांनी पदाचा राजीनामा दिला होता.

20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा झाल्यानंतर तासाभरातच पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसला होता. संघाचे मुख्य प्रशिक्षक मिस्बाह उल हक आणि गोलंदाजी प्रशिक्षक वकार यूनिस यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला होता. मिस्बाह आणि वकार यूनिस ही जोडगोळी सप्टेंबर 2019 पासून पाकिस्तान क्रिकेट संघासोबत होती. करारानुसार 1 वर्षांचा कालावधी बाकी असताना त्यांनी पदाचा राजीनामा दिला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी रमीझ राजा यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी राजीनामा दिला, अशी चर्चाही पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले.

या दोघांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिल्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताक आणि अब्दुल रझाक या दोघांना तात्पुरत्या स्वरुपात मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवडले होते. वर्ल्ड कपसाठी हीच जोडी राहणार की पाकिस्तानला नवा प्रशिक्षक मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. रमीझ राजा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच वर्ल्ड कपसाठी संघासोबत जाण्यास नवे प्रशिक्षक सज्ज असल्याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मॅथ्यू हेडन याची मुख्य प्रशिक्षक पदी तर फिलँडर याला गोलंदाजी कोच करण्यात आले आहे. लवकरच ही दोघे पदभार सांभळतील. त्यांच्या मार्गदर्शनाचा संघाला किती फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top