esakal | T20 World Cup: ऐनवेळी पाकिस्तानच्या संघात तीन बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam

T20 World Cup: ऐनवेळी पाकिस्तानच्या संघात तीन बदल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

Pakistan squad for ICC Men's T20 World Cup : विश्वचषकाच्या रनसंग्रामाला अवघे काही दिवस बाकी असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने टी20 विश्वचषकाच्या संघात तीन बदल केले आहेत. आजम खान, मोहम्मद हसनैन आणि खुशदील शाह यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्याजागी माजी कर्णधार सरफराज अहमद, फखर जमान आणि हैदर अली यांचा समावेश करण्यात आला आहे. मिस्बाह उल हकने मुख्य कोच पदाचा राजीनामा दिल्यानंतर फिरकी गोलंदाज शकलेन मुश्ताक यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. आयसीसीने 10 ऑक्टोबर 2021 पर्यंत टी-20 संघात बदल करण्याची मूभा दिली आहे.

राशिद लतीफ आणि शोएब अख्तर यांच्यासह पाकिस्तानच्या इतर माजी क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या संघात बदल करण्याची मागणी केली होती. त्यानुसार, पाकिस्तान संघात तीन बदल करण्यात आले आहेत. 24 ऑक्टोबर रोजी भारताविरोधातील सामन्यापासून पाकिस्तानच्या विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे.

मागील काही दिवसांतील खळाडूंची कामगिरी पाहून संघात बदल करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं दिले आहे.

पाकिस्तानचा टी-20 विश्वचषकासाठीचा संघ -

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रऊफ, हसन अली, इमाद वसीम, मोहम्मद हफीज, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), मोहम्मद वसीम जूनियर, सरफराज अहमद (विकेटकीपर)), शाहीन शाह अफरीदी आणि सोहैब मकसूद.

रिजर्व्ह खेळाडू: खुशदिल शाह, शाहनवाज दहानी आणि उस्मान कादिर.

loading image
go to top