नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा पुढील सामना येत्या १५ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचा भारतीय संघात समावेश होण्याची शक्यता आहे..वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगऐवजी कुलदीप यादवची भारतीय संघामध्ये निवड केली जाईल, असे स्पष्ट मत भारताचे माजी कर्णधार व सध्याचे समालोचक सुनील गावसकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले.सुनील गावसकर पुढे म्हणाले, की श्रीलंकेतील खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांना पोषक असतात. तसेच भारतीय संघामध्ये तीन फिरकी गोलंदाजांना स्थान देण्यात येते, हेही माहीत आहे. नामिबियाविरुद्धच्या लढतीत सर्व गोलंदाजांना विकेट मिळाल्या; पण अर्शदीप सिंग याला आपल्या खात्यातील पूर्ण षटके गोलंदाजी करता आली नाही..तसेच सूर्यकुमार यादव नामिबियाविरुद्धच्या लढतीत पाकिस्तानविरुद्धच्या लढतीची तयारी करीत होता. याच कारणामुळे त्याने डावातील पहिले षटक टाकण्यासाठी हार्दिक पंड्याकडे चेंडू सोपवण्यात आला. यावरून समजते, की अर्शदीप सिंगला पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत बाहेर बसवण्यात येणार आहे.गावसकर यांनी संजू सॅमसनच्या फलंदाजीबाबत मत व्यक्त केले. त्यांनी संजू सॅमसनच्या फलंदाजीतील त्रुटी सांगताना म्हटले, की संजू सॅमसन सध्या तांत्रिक समस्येमधून जात आहे. तो क्रीझमध्ये खोलवर जातो व फ्लिकचा फटका खेळतो. अशा वेळी त्याने मारलेला चेंडू गॅपमध्ये पडायला हवा..वरुण चक्रवर्तीचे कौतुकसुनील गावसकर यांनी फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याच्या गोलंदाजीचेही कौतुक केले. ते सांगतात, की वरुण चक्रवर्ती याने फक्त दोनच षटके गोलंदाजी केली. यामध्ये त्याने तीन फलंदाज बाद केले. त्याने चार षटके गोलंदाजी केली असती तर पाच ते सहा फलंदाज बाद केले असते. वरुणच्या गोलंदाजीची एक जमेची बाजू म्हणजे जेव्हा जेव्हा त्याला गोलंदाजीला बोलावतात, तेव्हा तेव्हा तो भारताला विकेट मिळवून देतो. अक्षर पटेल यानेही तीन षटकांमध्ये दोन फलंदाज बाद केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.