IND vs BAN: मैदानाबाहेर राहून विजयात खारीचा वाटा; शूज साफ करणाऱ्या हिरोला ओळखता का ?

IND vs BAN
IND vs BANesakal

पावसामुळे अतिरंजक झालेल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 5 धावांनी पराभव करत आपले सेमी फायनलचे तिकिट फिक्स केले. पण चर्चा होतीय ती बूट साफ करणाऱ्या रघूची. भारताच्या विजयात विराट कोहली, केएल राहुल, अर्शदीप सिंग यांनी मोलाचे योगदान दिले. मात्र, या सर्वांमध्ये आणखी एक व्यक्ती होता, ज्याने मोठा वाटा उचलला. (T20 World Team India Sidearm Thrower Raghu Cleans Shoes Of Players To Prevent Them From Slipping )

भारताच्या विजयात रघूने मोलाचा कामगिरी बजावली. रघू हे भारतीय संघाच्या प्रशिक्षण सदस्यांमध्ये सामील आहेत. पण हे रघू नेमकं कोणं आहेत? असा सवाल सर्वत्र उपस्थित होत आहे.

बांगलादेशविरुद्ध सामन्यात रघू यांची चर्चा का?

जेव्हा भारतीय संघ विजयासाठी बांगलादेशविरुद्ध लढताना दिसत होता, तेव्हा रघू मैदानावर खेळाडूंची मदत करत होते. सामन्याच्या दुसऱ्या डावावेळी पावसाने मैदानावर हजेरी लावली. त्यामुळे बांगलादेश संघाला फक्त 16 षटके खेळण्याची संधी मिळाली.

मैदान ओले होते आणि भारतीय खेळाडूंच्या बुटांवर माती चिटकली होती. रघू आपल्या ब्रशने भारतीय संघाच्या खेळाडूंच्या बुटांवरील माती काढत होते, जेणेकरून ओल्या मातीमुळे ते घसरणार नाहीत आणि त्यांना दुखापतही होणार नाही.

रघू यांची ही कामगिरी भारताच्या विजयात मोलाची ठरली आहे. भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यातील रघू यांचा हातात ब्रश घेतलेला फोटो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट संघाने टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या 35व्या सामन्यात बांगलादेशला धूळ चारली. या सामन्यात भारताने पावसामुळे डकवर्थ लुईस नियमांमुळे बांगलादेशला 5 धावांनी पराभूत केले. त्यामुळे भाराता सेमीफायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.भारताच्या या विजयात विराट कोहली, केएल राहुल, अर्शदीप सिंग यांनी मोलाचे योगदान दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com