Asia Cup 2023: धवनसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद! चीफ सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलले

shikhar dhawan
shikhar dhawansakal

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. तर संजू सॅमसनचा 18वा खेळाडू म्हणून संघात समावेश करण्यात आला. भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यातील एक प्रश्न शिखर धवनलाही विचारण्यात आला होता, आगरकरने ज्या पद्धतीने उत्तर दिले त्यावरून आता धवनचा टीम इंडियाचा मार्ग पूर्णपणे बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

shikhar dhawan
Asia Cup 2023 India Squad : आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा! 'या' दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी

आशिया कप 2023 साठी संघ जाहीर झाल्यानंतर अजित आगरकरला शिखर धवनबद्दल विचारले असता, ते म्हणाला की, धवनने गेल्या काही वर्षांपासून भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे, परंतु सध्या रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन हे आमचे आवडते सलामीवीर आहेत. अजितच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की, धवनसाठी तूर्तास टीम इंडियात पुन्हा एन्ट्री करणे सोपे जाणार नाही.

shikhar dhawan
Asia Cup 2023 India Squad : निवडकर्त्यांनी संजूला दिला मोठा झटका, या खेळाडूमुळे झाला संघातून बाहेर

शिखर धवन जवळपास 38 वर्षांचा आहे आणि त्याने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हापासून तो वनडे फॉरमॅटमध्येही टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यामुळे टीम इंडियात त्याचे पुनरागमन शक्य नाही.

या पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माही शिखर धवनबद्दल बोलला आणि म्हणाला की, मी आणि धवन भारतासाठी खूप दिवसांपासून ओपनिंग करत आहोत. अशा स्थितीत मी सलामी देईन आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. ही स्थिती बदलण्याची गरज नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com