
IND vs NZ : टीम इंडियाची आज टुंडे कबाबची जंगी पार्टी; हा खेळाडू करणार खर्च, Video
लखनऊ : भारताने रविवारी न्यूझीलंडसोबत झालेल्या टी२० सामन्यात रोमहर्षक विजय मिळवत मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी केली. तर पुढच्या टी२० सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याचे भारताचे ध्येय असेल. तर दुसरा सामना जिंकल्यानंतर आता भारतीय टीम उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे जंगी पार्टी करणार आहे.
हेही वाचा - T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
दुसरा सामना जिंकल्यानंतर भारताचा स्फोटक फलंदाज सुर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल एकमेकांची मुलाखत घेताना दिसून आले. यावेळी तू अजून टुंडे कबाबची पार्टी दिली नाही असं चहल कुलदीपला म्हणाला. त्यानंतर, "नक्कीच पार्टी होईल... टुंडे कबाबची पार्टी उद्याच होईल...कबाबची ऑर्डरही दिली आहे" असं कुलदीप म्हणतो.
दरम्यान, लखनौमध्ये खेळला गेलेला भारत-न्यूझीलंड सामना क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय राहिला. या सामन्यात टीम इंडियाने एक चेंडू बाकी असताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम खेळताना न्यूझीलंड संघाला केवळ 99 धावा करता आल्या. मात्र, टीम इंडियाला 100 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना खूप संघर्ष करावा लागला आणि अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. सूर्यकुमार यादवने 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.