IND vs SL T20 Series: श्रीलंकेविरुद्ध विराटची जागा घेणार हा खेळाडू? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs SL T20 Series

IND vs SL T20 Series: श्रीलंकेविरुद्ध विराटची जागा घेणार हा खेळाडू?

नवीन वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंका टीम भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. जानेवारी (2023) महिन्यामध्ये दोन्ही टीममध्ये प्रत्येकी तीन मॅचेसची टी-20 आणि वन-डे सीरिज खेळवली जाणार आहे. दरम्यान, आज संघाची घोषणा होणार आहे. या मॅचेससाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Team India for IND vs SL Series Virat kohli Rahul Tripathi Rohit Sharma KL Rahul )

या मालिकेतून विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार असून मधल्या फळीत फलंदाजीसाठी ३१ वर्षीय राहुल त्रिपाठीला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुल त्रिपाठी अलीकडेच बांगलादेश दौऱ्यावर एकदिवसीय संघात दाखल झाला होता. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

हेही वाचा: Aditi Swamy : आदितीला तिरंदाजीत रौप्यपदक

2022 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्रिपाठी पहिल्यांदा भारतीय संघाचा भाग बनवण्यात आलं होते, पण त्या मालिकेत तो पदार्पण करू शकला नाही.

हेही वाचा: Abdul Razzaq VIDEO : बुमराहला बेबी बॉलर म्हणणाऱ्या रझाकची त्याच्या मुलाने केली अशी अवस्था की...

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉलादेखील संधी मिळू शकते. पृथ्वी शॉने 2021 मध्ये भारतासाठी पहिला आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आता पुन्हा एकदा त्याला भारताच्या T20 संघात स्थान मिळू शकते. पृथ्वी शॉने IPL मध्ये 147.45 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्यामुळे एक सलामीवीर म्हणून तो टीम इंडियामध्ये आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभावू शकतो.

हेही वाचा: Rohit Sharma KL Rahul : रोहित दुखापतीमुळे तर राहुल... श्रीलंका मालिकेला कर्णधार - उपकर्णधार मुकणार!

शॉ सलामीला येऊन झटपट धावा करण्यासाठी ओळखला जातो. केएल राहुलच्या जागी पृथ्वी शॉला संघात संधी दिली जाऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो चांगली कामगिरी करत आहे. शॉ गेल्या काही दिवसांपासून त्याच्या फिटनेसवर देखील सतत काम करताना दिसत आहे. आयपीएल 2022 पासून त्याने 7-8 किलो वजन कमी केल्याचे समोर आले आहे.