Prithvi Shaw: टीम इंडियानं बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर पृथ्वी शॉने घेतला मोठा निर्णय! आता या संघाकडून खेळणार

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series
prithvi shaw on selection for-ind vs nz t20 seriessakal

Prithvi Shaw : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याने 5 कसोटी, 6 एकदिवसीय आणि एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 25 जुलै 2021 रोजी भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला. तेव्हापासून तो कोणत्याही भारतीय संघात परत येऊ शकला नाही.

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series
Team India : टीम इंडियाच्या कर्णधारामुळं संपलं भविष्यात सुपरस्टार बनू शकणाऱ्या खेळाडूचं करियर?

देशांतर्गत स्तरावर चांगली कामगिरी करणारा पृथ्वी शॉ टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. सध्या तो दुलीप ट्रॉफी 2023 मध्ये वेस्ट झोन संघाचा भाग आहे. पश्चिम विभागाचा संघ या स्पर्धेतील पहिला सामना 5 जुलैपासून खेळणार आहे, तर अंतिम सामना 12 जुलै ते 16 जुलै दरम्यान खेळवला जाईल. जर त्याचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो या सामन्यातही खेळेल, परंतु दुलीप ट्रॉफी संपल्यानंतर पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series
NZ vs SL ODI : मैदानातील अंपायर झोपेत! ODI सामन्यात गोलंदाजाने टाकली 11 षटके, अन्...

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पृथ्वी शॉ दुलीप ट्रॉफी 2023 संपल्यानंतर काउंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. तो काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळणार आहे. चेतेश्वर पुजारा, नवदीप सैनी आणि अर्शदीप सिंग यांच्यासह अनेक भारतीय क्रिकेटपटू काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळतात. आता पृथ्वी शॉनेही यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत केली जाणार आहे.

prithvi shaw on selection for-ind vs nz t20 series
Ireland Series : आयर्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

पृथ्वी शॉने भारतासाठी 5 कसोटी सामने खेळले असून, त्याने 42.37 च्या सरासरीने 339 धावा केल्या आहेत, ज्यात एक शतक आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या 134 धावा आहे. IPL 2023 पृथ्वी शॉसाठी खूप वाईट होते आणि त्याने 8 सामन्यात 13.25 च्या सरासरीने फक्त 108 धावा केल्या.

पृथ्वी शॉ भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. जर त्याने कौंटीमध्ये चांगली कामगिरी केली तर ते शक्य होऊ शकते. त्याने 42 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 12 शतकांच्या मदतीने 3679 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 379 धावा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com