ravichandran ashwin and sanjay manjrekar
ravichandran ashwin and sanjay manjrekartwitter

मित्रा ह्रदय तुटते! अश्विनने घेतली मांजरेकरांची फिरकी

अश्विन सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत का येत नाही याचे कारणही मांजरेकरांनी सांगितले होते. त्यांच्या ट्विटवर आता खुद्द अश्विनने रिप्लाय दिलाय.
Published on

भारताचे माजी क्रिकेटर आणि समालोचक संजय मांजरेकरांची रविचंद्रन अश्विनने फिरकी घेतलीये. ऑल टाईम ग्रेट प्लेयर्समध्ये अश्विनचा समावेश न केल्याने संजय मांजरेकर चर्चेत आले होते. अश्विन सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत का येत नाही याचे कारणही मांजरेकरांनी सांगितले होते. त्यांच्या ट्विटवर आता खुद्द अश्विनने रिप्लाय दिलाय. (Team-India-Ravichandran-Ashwin-Replies-Sanjay-Manjrekar-Hilarious-Meme)

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी सध्याच्या घडीला भारताचा स्टार फिरकीपटू असलेल्या अश्विनसंदर्भात वादग्रस्त ट्विट केले होते. यावर अश्विनने एका मिम्सच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. संजय मांजरेकरांची फिरकी घेताना अश्विनने 'अपरिचित' या तमिळ चित्रपटातील डायलॉगचा आधार घेतलाय. त्याने या चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर केलाय. ज्यामध्ये प्रमुख हिरो आपल्या मित्राला "असं करु नकोस, माझे ह्रदय तुटते" अशा अर्थाचा डायलॉग हाणतानाचा क्षण क्रिएट करुन माजरेकरांना क्लीन बोल्ड केलयं.

ravichandran ashwin and sanjay manjrekar
छेत्रीची कमाल! मेस्सीला टाकलं मागे; आता फक्त रोनाल्डो पुढे

मांजरेकरांनी नेमकं काय म्हटले होते.

‘ईएसपीएनक्रिकइंफो’च्या ‘रनऑडर’ या कार्यक्रमात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटर इयान चॅपल यांनी आर अश्विनवर कौतुकाचा वर्षाव केला. सध्याच्या घडीला अश्विन हा सर्वोत्तम कसोटी गोलंदाजांपैकी एक आहे, असे ते म्हणाले होते. मांजरेकर यांना मात्र चॅपल यांचे हे वक्तव्य पटले नाही. माजरेकर यांनी अश्विनचे परदेशातील रेकॉर्डकडे लक्ष वेधत त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. मायदेशात रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यानेही दमदार कामगिरी केली आहे, असा दाखलाही त्यांनी दिला.

ravichandran ashwin and sanjay manjrekar
19 वर्षांच्या पोरानं जोकोविचला दिली तगडी फाईट; पण...

मांजरेकर म्हणाले होते की. अश्विन सर्वकालीन महान गोलंदाज आहे, असे वाटत नाही. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात एकदाही पाच विकेट्स घेतलेल्या नाहीत. भारतीय खेळपट्टीवरील त्याच्या कामगिरीची संजय मांजरेकर यांनी जडेजाच्या गोलंदाजीशी तुलना केली होती. मागील चार वर्षात जडेजाने अश्विनच्या बरोबरीची कामगिरी केल्याचे ते म्हणाले होते. अश्विनच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी संजय मांजरेकरांवर निशाणा साधला. यावर आता खुद्द रविचंद्रन अश्विन यानेही प्रत्युत्तर दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com