Team India : वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाचा प्लॅन बदलला! BCCI ने शेड्यूल मध्ये अचानक केला मोठा बदल

बीसीसीआयने संघाच्या योजनेत केला बदल
ind vs aus odi
ind vs aus odi

Team India जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा थरार 31 मार्चपासून सुरू होत आहे. इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटी होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ संघ सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून खेळल्या जाणार आहे. तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये टीमला आशिया कप खेळायचा आहे. मात्र, आता बीसीसीआयने संघाच्या योजनेत थोडा बदल केला आहे.

ind vs aus odi
6,6,6,6,6... IPL 2023 पूर्वी रोव्हमन पॉवेलचे वादळ, वेस्ट इंडिजचा विजय! राजधानी दिल्लीत वाटले पेढे

आयपीएल संपल्यानंतर जवळपास महिनाभरानंतर भारत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे, परंतु त्याआधी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या या दौऱ्यात थोडा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाला या दौऱ्यात 2 कसोटी सामने, 3 टी-20 सामने आणि तीन ODI सामने खेळायचे होते पण आता त्यात बदल झाला आहे.

आता हा दौरा 10 सामन्यांचा झाला आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या 3 टी-20 सामन्यांऐवजी आता एकूण 5 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे. याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

ind vs aus odi
WPL 2023 Winner Prize Money: विजेत्यावर पडणार करोडो रुपयांचा पाऊस! जाणुन घ्या कोणाला किती मिळणार

भारताचा वेस्ट इंडिज दौरा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे, तर येत्या काही दिवसांत या दौऱ्यावर कोणता सामना होणार याची संपूर्ण माहिती समोर येणार आहे. 10 सामन्यांचा दौरा संपल्यानंतर, संघ तीन टी-20 खेळण्यासाठी ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात आयर्लंडला जाणार आहे. खुद्द क्रिकेट आयर्लंडनेच ही माहिती दिली.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी बीसीसीआय रोहित शर्मा आणि कंपनीसाठी मायदेशात एक छोटी द्विपक्षीय मालिका आयोजित करण्याची योजना आखत आहे. क्रिकबझने अहवाल दिला की शक्य असल्यास, लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यानंतर जून 2023 च्या उरलेल्या दिवसांत श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com