esakal | टेनिसपटू अर्जुन-साकेतला चॅलेंजर विजेतेपद
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun-Saket Tennis

भारताच्या अर्जुन कढे-साकेत मायनेनी यांच्या जोडीने चीनमधील चेंगडू एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी कोरियाच्या नाम जी सुंग-सॉंग मीन क्‍यू यांच्यावर 6-3, 0-6, 10-6 अशी मात केली. अर्जुन-साकेतने भक्कम खेळ करताना सहापैकी तीन ब्रेकपॉइंट जिंकले.

टेनिसपटू अर्जुन-साकेतला चॅलेंजर विजेतेपद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारताच्या अर्जुन कढे-साकेत मायनेनी यांच्या जोडीने चीनमधील चेंगडू एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी कोरियाच्या नाम जी सुंग-सॉंग मीन क्‍यू यांच्यावर 6-3, 0-6, 10-6 अशी मात केली. अर्जुन-साकेतने भक्कम खेळ करताना सहापैकी तीन ब्रेकपॉइंट जिंकले.

दुसरीकडे त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीला एकच ब्रेकपॉइंट मिळू दिला, जो त्यांनी वाचविला. एक तास दोन मिनिटे चाललेल्या सामन्यात त्यांनी चार बिनतोड सर्व्हिस केल्या. प्रतिस्पर्धी जोडीला अशी एकही सर्व्हिस करता आली नाही.
अर्जुनसाठी ही कामगिरी महत्त्वाची ठरली. तो यंदा आयटीएफ स्पर्धांत तीन वेळा अंतिम फेरीत हरला होता. त्यामुळे मोसमातील पहिले विजेतेपद चॅलेंजर पातळीवर मिळविणे त्याच्यासाठी उल्लेखनीय ठरले.

दुखपतींचा अडथळा आलेल्या साकेतने मोसमात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारली होती. त्याने भारतीय खेळाडूंबरोबर यश मिळविले आहे. सनम सिंगसह तीन, तर दिवीज शरण, जीवन नेदून्चेझीयन, विजयसुंदर प्रशांत व आता अर्जुन यांच्या प्रत्येकी एक वेळा तो विजेता ठरला.

या स्पर्धेत अग्रमानांकित चिनी जोडीवर, जे डेव्हिस करंडक खेळतात त्यांना हरविणे टर्निंग पॉइंट ठरले. कोरियाचे खेळाडूसुद्धा डेव्हिस करंडक खेळलेले आहेत. त्यामुळे ही कामगिरी मनोधैर्य उंचावणारी आहे.
- अर्जुन कढे

loading image