टेंट्र बोल्ट न्यूझीलंडकडून ठराविक सामने खेळणार

सततच्या क्रिकेटचा ताण होतोय असह्य
Trent Boult
Trent Boult sakal media

ऑकलंड : जागतिक कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत सध्या पहिल्या स्थानावर असलेल्या ट्रेंट बोल्‍टला त्याच्या स्वतःच्या मागणीवरून न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने वार्षिक करारातून मुक्त केले आहे. कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी आपण हे पाऊल उचलले असल्याचे बोल्टने सांगितले.

७० कसोटी १३७ मर्यादित षटकांचे सामने खेळलेला बोल्ट न्यूझीलंडकडून पुढेही खेळणार आहे, प्रत्येक सामन्यासाठी त्याने उपलब्ध असावे, असे बंधन न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे असणार नाही. बोल्ट त्याला इच्छेनुसार उपलब्ध असेल.

असा निर्णय घेणे माझ्यासाठी कठीण होते. देशाकडून खेळावे हे माझे लहानपणापासून स्वप्न होते. त्यामुळे आत्तापर्यंत मिळालेल्या संधीचा मला अभिमान आहे, शेवटी सामन्यांची संख्या कमी करण्याचा हा निर्णय माझी पत्नी आणि तीन लहान मुलांशी संबंधित आहे. कुटुंब माझ्यासाठी प्राधान्य आहे आणि त्यानंतर क्रिकेट आहे, असे बोल्टने न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बोल्ट आणि टीम साऊदी ही वेगवान जोडी न्यूझीलंडची गेल्या काही वर्षीतील हुकमी ठरलेली आहे. कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत मिळवलेले विजेतेपद, तसेच गेल्या दोन ५०-५० षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेत न्यूझीलंडने अंतिम फेरीत मारलेली धडक या दोघांमुळे शक्य झालेली आहे.

न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघातून आता मर्यादित सामने खेळणारा बोल्ट विविध देशांतील लीगसाठी उपलब्ध असेल. त्याच्या या निर्णयाचाही आम्ही आदर करत आहोत, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.

देशाकडून खेळण्याची माझी प्रबळ इच्छा अजूनही कायम आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्णायक कामगिरी करण्याची क्षमता कायम आहे, फरक एवढाच की मी राष्ट्रीय संघाशी करारबद्ध नसेन, असे बोल्टने सांगितले.

कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेल्यानंतर भरपूर प्रमाणात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे. त्यामुळे खेळाडूंना सातत्याने कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. त्याचा परिणाम खेळाडूंच्या मानसिकतेवर होत असल्यामुळे बोल्टने हा निर्णय घेतला असला तर त्याचा आम्ही आदर करतो, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे प्रमुख डेव्हिड व्हाईट म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com