
बातुमी (जॉर्जिया) : भारतीय आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुख हिने फिडे महिला विश्वकरंडक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पहिल्या डावात अनुभवी ग्रँडमास्टर कोनेरू हंपीला बरोबरीत रोखले. दडपणाखालीही संयम व आक्रमकतेचा मेळ साधत दिव्याने महत्त्वपूर्ण सामना बरोबरीत राखला.