ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ३५ वर्षांनी BCCI चे सामने | cricket sports update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dadoji konddev stadium

ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ३५ वर्षांनी BCCI चे सामने

ठाणे : दादोजी कोंडदेव स्टेडियमवर (Dadoji konddev stadium) तब्बल ३५ वर्षांनी बोर्ड फॉर कंट्रोल ऑफ क्रिकेट इन इंडिया (BCCI), अर्थात बीसीसीआयचे (एमसीए) (MCA) सामने रंगणार आहेत. बीसीसीआयची अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या विजय हजारे (Vijay Hajare trophy) करंडकाचे पाच सामने (Five cricket Matches) दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रंगणार आहेत.

हेही वाचा: मुंबई : प्रभाग पद्धतीबाबत भूमिका स्पष्ट करा; न्यायालयाचे निर्देश

दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तब्बल ३५ वर्षांपूर्वी १९८६ मध्ये रणजी करंडक सामने झाले होते. त्यानंतर काही कारणास्तव या स्टेडियमवर स्पर्धात्मक क्रिकेट सामने होऊ शकले नव्हते, परंतु पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार महापौर नरेश म्हस्के, आयुक्त डॉ. विपीन शर्मा, नगरसेवक विकास रेपाळे, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे आदींनी एमसीएच्या सामन्यांसाठी आवश्यक असलेले बदल या मैदानात केल्यामुळे विजय हजारे करंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील सामने आता या मैदानात होणार आहेत.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने ठाणे महापालिकेला पाठवलेल्या पत्रानुसार ता. ६ व ७ डिसेंबर रोजी या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार असून ८, ९, ११, १२ आणि १४ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. बीसीसीआयच्या विजय हजारे करंडकासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे सामने दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणे ही चांगली गोष्ट असून ठाणे महापालिकेने यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

loading image
go to top