Eng vs Aus : ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर! ख्वाजा भाऊने ठोकले शामदार शतक

उस्मान ख्वाजाचे शतक; हेड, केरी यांचीही अर्धशतके
The Ashes 2023 eng vs aus Usman Khawaja
The Ashes 2023 eng vs aus Usman Khawaja SAKAL

England VS Australia Usman Khawaja : चारशे पार धावा करण्याची संधी असताना आणि शतकवीर ज्यो रूट मैदानावर असताना डाव घोषित करण्याचा इंग्लंडने घेतलेला धाडसी निर्णय त्यांच्या मुळावर येण्याची शक्यता दिसू लागली आहे. उस्मान ख्वाजाच्या नाबाद १२६ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चोख प्रत्युत्तर दिले असून पहिल्या अॅशेस कसोटीत दुसऱ्या दिवस अखेर ५ बाद ३११ अशी मजल मारली. आता केवळ ८२ धावांनी ते पिछाडीवर आहेत.

अॅशेस मालिकेत हमखास यशस्वी ठरत असलेल्या ख्वाजाने पुन्हा एकदा इंग्लंड गोलंदाजांना सतावले. २ बाद २९ अशी अवस्था झालेल्या आपल्या संघाचा डाव त्याने केवळ सावरलाच नाही तर इंग्लंडला जशास तसे उत्तर देणारी खेळी केली.

The Ashes 2023 eng vs aus Usman Khawaja
ENG vs AUS : 'भाऊ हे काय...' स्टुअर्ट ब्रॉडच्या हॅटट्रिकसाठी बेन स्टोक्सने लावली विचित्र फिल्डिंग

एकी कडे ख्वाजा शतकी खेळी साकारत असताना त्याला दुसऱ्या बाजूने ट्रॅव्हिस हेड (५०) आणि अलेक्स केरी (नाबाद ५२) यांनी मोलाची साथ दिली. शतकानंतर ख्वाजाला स्टूअर्ट ब्रॉडने त्रिफाळाचीत केले होते, परंतु तो नोबॉल होता. कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारताविरुद्ध आक्रमक दीडशतकी खेळी करणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने आजही तोच आक्रमक बाणा दाखवला आणि अर्धशतकांत आठ चौकार व एक षटकार मारला. शतकवीर ख्वाजानेही १४ चौकार आणि दोन षटकारांची चमक दाखवली.

The Ashes 2023 eng vs aus Usman Khawaja
Indonesia Open 2023: बॅडमिंटनमधून आनंदाची बातमी! सात्विक अन् चिराग पोहचले इंडोनेशिया ओपनच्या फायनलमध्ये

तत्पूर्वी याच ब्रॉडने सलग दोन चेंडूंवर डेव्हिड वॉर्नर आणि लबूशेन यांना बाद करून सनसनाटी निर्माण केली होती त्यानंतर बेन स्टोक्सने स्टीव स्मिथला बाद केले. स्मिथने १६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची ३ बाद ६७ अशी अवस्था झालेली असताना ख्वाजाने डाव सावरला.

संक्षिप्त धावफलक ः

इंग्लंड, पहिला डाव ः ८ बाद ३९३ घोषित. ऑस्ट्रेलिया, पहिला डाव ः ९४ षटकांत ५ बाद ३११(उस्मान ख्वाजा खेळत आहे १२६, स्टीव स्मिथ १५, ट्रॅव्हिस हेड ५०, कॅमरुन ग्रीन २८, अलेक्स केरी खेळत आहे ५२, ब्रॉड १६-३-४९-२, मोईन अली २९-४-१२४-२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com