
नितीन मुजुमदार
Rafael Nadal: बरोबर दोन दशकांपूर्वी घडलेली घटना!२००५साल होते ते,त्या १९वर्षीय टेनिसपटूने नुकतीच पहिल्याच प्रयत्नांत फ्रेंच ओपन जिंकली होती.साहजिकच सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता.त्याच्या जवळच्या वर्तुळातील एक व्यक्ती मात्र अगदी तटस्थपणे या साऱ्याकडे बघत होती...त्या युवा टेनिसपटूचा प्रशिक्षक, टोनी, जो त्याचा काकाही होता.