"ते हिंदुस्थानी असूच शकत नाहीत"

Mohammad Shami
Mohammad Shami Sakal

युएईच्या मैदानात रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीला (Mohammad Shami) ट्रोल करण्यात आले होते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील पराभवाचे खापर नेटकऱ्यांनी त्याच्यावर फोडले. या परिस्थितीत तत्कालीन कर्णधार विराट कोहलीनं (Virat Kohli)त्याची पाठराखण केल्याचेही पाहायला मिळाले. आता मोहम्मद शमी स्वत: यावर मोकळेपणाने बोलला आहे.

इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये शमीनं टोलर्संना टोला लगावला. ट्रोल करण्याऱ्यांबद्दल तो म्हणाला की, जे लोक धर्मावरुन एखाद्याला ट्रोल करतात त्यांच्यावर कोणताही इलाज नाही. असा विचार करणाऱ्यांना खरे चाहते आणि हिंदुस्थानीच म्हणता येणार नाही, अशा शब्दांत त्याने टोलर्संची कानउघडणी केलीये. जो एखाद्या खेळाडूला हिरो मानतो तो त्याच्याबद्दल वाईट कृत्य करत नाही, असे मी मानतो. जर एखादागैरवर्तन करत असेल, तर तो एक चांगला चाहता किंवा भारतीय असू शकत नाही, असे मत मोहम्मद शमीनं मांडले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करणाऱ्यांना फार मनावर घेत नाही, असेही तो म्हणाला.

Mohammad Shami
IPL 2022 : पंजाबचा 'सेनापती' ठरला; 12 कोटींच्या गड्यावरच 'प्रिती'

शमीला एकही विकेट मिळाली नव्हती

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. वर्ल्ड कपच्या इतिहासत भारताविरुद्ध पहिला सामना पाकिस्तानने 10 विकेट्स राखून जिंकला होता. मोहम्मद शमीने 3.5 षटकात 43 धावा खर्च केल्या होत्या. या खराब कामगिरीनंतर मोहम्मद शमीला धार्मिकतेच्या मुद्यावरुन ट्रोल करण्यात आले होते.

Mohammad Shami
मुलीनंतर आता वडील गेल्याचा फोन आला...विष्णू सुन्न झाला

कोहलीने उघडपणे दिला होता पाठिंबा

भारतीय संघाचा तत्कालीन कर्णधार विराट कोहलीने उघडपणे शमीला पाठिंबा दर्शवला होता. कोणत्याही व्यक्तीवर धर्माच्या आधारावर निशाणा साधणे अयोग्य आहे. माझ्यासह संपूर्ण भारतीय संघ शमीच्या पाठिशी ठामपणे उभा आहे, असे कोहलीनं म्हटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com