Champions Trophy आधी पाकिस्तानला मोठा धक्का! तीन खेळाडूंवर आजीवन बंदीची कारवाई

Pakistan team : पाकिस्तानचे तीन खेळाडू व एका फिजिओवर शिस्तभंगाची कारवाई केली गेली आहे.
Pakistan Players Banned
Pakistan Players Bannedesakal
Updated on

Pakistan Players Banned: आशियाई चॅम्पियन्स ट्ऱॉफी हॉकी स्पर्धेपूर्वी पाकिस्तानी संघाला खूप मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (PHF) ८ ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत चीनमधील इनर मंगोलियातील हुलुनबुर येथे खेळल्या जाणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीआधी ३ हॉकीपटू आणि एका फिजिओथेरपिस्टवर आजीवन बंदी घातली आहे. फेडरेशनला न कळवता परस्पर युरोपमध्ये लीग सामने खेळण्यासाठी गेल्याने PHFने मुर्तझा याकूब, इहतेशाम अस्लम आणि अब्दुर रहमान व फिजिओ वकास यांच्यावर ही कारवाई केली आहे.

पीएचएफचे सरचिटणीस राणा मुजाहिद यांनी सांगितले की, "मुर्तझा याकूब, इहतेशाम अस्लम आणि अब्दुर रहमान व फिजिओ वकास हे गेल्या महिन्यात नेशन्स कपसाठी हॉलंड आणि पोलंडच्या दौऱ्यात राष्ट्रीय संघाचा भाग होते. संघ मायदेशी परतल्यावर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येणार होते. तेव्हा या खेळाडूंनी कारण सांगून टाळाटाळ केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार हे खेळाडू पुन्हा पोलंडला गेल्याचे समजले. त्यानंतर ही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे."

"PHF ची आर्थिक परिस्थिती काही ठिक नाही. त्यात खेळाडूंना प्रवास भत्ते व दैनंदिन भत्ते वेळेत मिळत नाही. पण, असे असले तरी राष्ट्रीय संघाला सोडून दुसऱ्या देशात आश्रय मागणे ही पाकिस्तानची बदनामी करण्यासारखं आहे, ते योग्य नाही," असेही मुजाहिद म्हणाले. PHF ने खेळाडूंवरील आजीवन बंदी मंजूर केली आहे आणि शिस्तभंगाच्या कारवाईसाठी परराष्ट्र मंत्रालयाला सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com