विल्यम्सनला विश्रांती; संघाची धुरा या वेगवान गोलंदाजाकडे

वृत्तसंस्था
Tuesday, 20 August 2019

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1 सप्टेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज टीम साऊदी संघाचे नेतृत्व करणार आहे. 

कोलंबो : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात 1 सप्टेंबरपासून ट्वेंटी20 मालिकेला सुरवात होणार आहे. या मालिकेसाठी किवींचा कर्णधार केन विल्यम्सनला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याजागी वेगवान गोलंदाज टीम साउदी संघाचे नेतृत्व करणार आहे. 

विल्यम्सनबरोबरच वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यालाही विश्रांती देण्यात आली आहे यष्टिरक्षक टीम सेइफर्ट हा दुखापतीतून सावरला असून त्याचे पुनरागमन झाले आहे. शिवाय मिचेल सँटनर, टोड अॅस्टेल आणि ईश सोढी या तीन फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे.

विल्यम्सन आणि बोल्ट यांनी विश्वकरंडक स्पर्धेत संघासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पुढील आव्हानांसाठी त्यांना पुरेशी विश्रांती मिळण्याची आवश्यकता आहे,'' असे निवड समितीचे प्रमुखे गॅव्हीन लार्सेन यांनी सांगितले. या मालिकेत एकूण तीन सामने होणार आहे. 

न्यूझीलंड संघ - टीम साऊदी, टॉड अॅस्टल, टॉम ब्रुस, कॉलीन डी ग्रँडहोम, ल्युकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, स्कॉट कुग्गेलेईंज, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, सेथ रँस, मिचेल सँटनर, टीम सेइफर्ट, ईश सोढी, रॉस टेलर. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tim Southee To Lead New Zealand In Sri Lanka T20 Series