esakal | Olympics : पदार्पणात लवलिनाला कांस्य; भारताच्या खात्यात तिसरे पदक
sakal

बोलून बातमी शोधा

 Lovlina Borgohain

Olympics : पदार्पणात लवलिनाला कांस्य; भारताच्या खात्यात तिसरे पदक

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2021 : टॉकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील लवलिना बोर्गोंहिमचा प्रवास सेमीफायनलमध्येच संपुष्टात आलाय. 69 किलो वजनी गटात पदार्पणातच तिने लक्षवेधी कामगिरी नोंदवलीये. तुर्कस्तानची विद्यमान विश्वविजेती बुसेनाझ सुरमेनेली हिच्या विरुद्धच्या लढतीतील पराभवामुळे लोवलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तिच्या या पदकासह भारताच्या खात्यात 3 पदके जमा झाली आहेत.

हेही वाचा: Olympics: गुड मॉर्निंग इंडिया; टोकियोत नीरजनं जागवली गोल्डची आस

स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूने वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये सिंधूला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. आसामची 23 वर्षीय बॉक्सर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी तिसरी भारतीय ठरलीये. यापूर्वी विजेंदर सिंग (2008) आणि मेरी कोम (2012)मध्ये पदकाची कमाई केली होती. या दोघांनाही कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. महिला वेल्टर वेट सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करुन लोवलिनाने पदक निश्चित केले होते.

हेही वाचा: भारतातलं वास्तव! ऑलिंपिक पदक निश्चितीमुळे लवलिनाच्या गावाला मिळाला रस्ता

loading image
go to top