esakal | Olympics Day 3: भारतीय हॉकी संघाचा पराभव; 1-7 नं सामना गमावला
sakal

बोलून बातमी शोधा

INDvsAUS

Olympics Day 3: भारतीय हॉकी संघाचा पराभव; 1-7 नं सामना गमावला

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 Day 3 LIVE Updates : तिसऱ्या दिवशी 10 मीटर पिस्टल प्रकारात भारताच्या पदरी निराशा आली. महिला गटात मनू भाकेर आणि यशस्वीनी सिंग जसवाल यांच्यावर पात्रता फेरीतच बाद होण्याची वेळ आली. दुसऱ्या बाजूला बॅटमिंटनमध्ये अपेक्षेप्रमाणे पीव्ही सिंधून विजयी सलामी दिलीये.

भारतीय हॉकी संघानं सामना गमावला

भारतीय पुरुषांच्या हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना १-७ अशा मोठ्या फरकानं गमावला.

ऑस्ट्रेलियाच्या सामन्यावर मजबूत पकड हाफटाईममध्ये घेतली 4-0 अशी आघाडी

हॉकीच्या मैदानात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना

टेबल टेनिस पुरुष एकेरीत भारताला निराशा

भारताच्या जी साथियानचा 3-1 आघाडी घेऊनही पराभव, हॉंगकॉंगच्या खेळाडूनं 4-3 असं हरवलं

मनिका बत्राचा सनसनाटी विजय, युक्रेनच्या खेळाडूचा 4-3 ने केला पराभव. तिसऱ्या फेरीत केला पराभव

बॉक्सर मेरी कोमची विजयी सलामी, डोमिनिकाच्या खेळाडूचा 4-1 ने केला पराभव

टेबल टेनिस : मनिका बत्रातने सलग दोन सेट गमावले

महिलांची लेसर रेडीयल शर्यत : पहिल्या शर्यतीच्या तुलनेत दुसऱ्या शर्यतीत उत्तम कामगिरी करत नेत्रा कुमानन 16 व्या स्थानी

टेबल टेनिस : पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत जी. साथीयान पराभूत, हाँकाँगच्या शी हँग लॅम (Siu Hang Lam) याने त्याला 4-3 अशी मात दिली

नेमबाजीत आणखी एक धक्का

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला भारताचा नेमबाज दिव्यांश पनवार आणि दीपक कुमार या दोघांनाही 10 मीटर एअर रायफल इवेंटमध्ये फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.

दमदार सुरुवातीनंतर सानिया-अंकिताचा खेळ खल्लास!

भारताचा स्टार टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि अंकित रैनाला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला दुहेरीत या दोघींनी पहिला सेट 6-0 असा जिंकत धमाकेदार सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये ही जोडी 5-3 अशी आघाडीवर होती. मात्र या सामन्यात त्यांना 6-0, 6-7, 8-10 असा पराभव स्वीकारावा लागला.

टेनिस – पुरुष एकेरीतून अँडी मरेची माघार

जिम्नॅस्टिक : महिला जिम्नॅस्टीकमधील बॅलन्स बीम व फ्लोअर पात्रता फेरीत 42.565 गुणांसह प्रणाती नायक 12 व्या स्थानावर

रोविंग :

पुरुषांच्या लाइट डबल्स स्कल्स रिपॅजे प्रकारात अरविंद सिंग आणि अरुणलाल सिंग सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. या जोडीने लाइटवेट पुरुष दुहेरीतील स्कल के रेपेचेज राउंडमध्ये 6:51:36 वेळेत अंतर कापत तिसरे स्थान मिळवून सेमीफायनलमधील स्थान पक्के केले.

महिला बॅडमिंटन एकेरीत पीव्ही सिंधूची दमदार ओपनिंग

मनू भाकेर आणि यशस्विनी देसवाल या युवा नेमबाजांच्या पदरी निराशा आली. 10 मीटर पिस्टल प्रकारात या दोघी अनुक्रमे 12 व्या आणि 13 व्या स्थानावर राहिल्या.

loading image
go to top