esakal | Olympics Day 5 : नेमबाजांचा काय नेम नाय!
sakal

बोलून बातमी शोधा

Shooting

Olympics Day 5 : नेमबाजांचा काय नेम नाय!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 Day 5 live Updates : नेमबाजीमध्ये 10 मीटर पिस्टलसह रायफल प्रकारातही भारताच्या पदरी निराशा आली. मिश्र एअर रायफल सांघिक इवेंटमध्ये निराशा, दिव्यांश सिंग पन्वर आणि इलावरिवन जोडी 12 व्या तर अंजूम मौदगील आणि दीपक कुमार 18 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

  • बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग-सात्विक जोडीने साखळी फेरीतील अखेरचा सामना जिंकला. पण त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ग्रुप ए मध्ये ही जोडी तिसऱ्या स्थानावर राहिली.

  • ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पराभवानंतर स्पेन विरुद्धच्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघान दमदार कमबॅक केले. अ गटातील तिसऱ्या सामन्यात सामन्यात पहिल्या 15 मिनिटातच भारताने गोल डागला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये दुसरा गोल डागून पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली. अखेरच्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल डागत भारतीय संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केलीये. भारतीय संघाचा पुढील सामना अर्जेंटिनाशी होणार आहे.

  • भारतीय नेमबाजांनी पाचव्या दिवसाच्या खेळाला दमदार सुरुवात केली. पण 10 मीटर एअर पिस्टल सांघिक मिश्र प्रकारात मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांच्यासह यांच्यासह अभिषेक वर्मा आणि यशस्वी सिंग देसवाल यांचे आव्हान संपुष्टात आले. पात्रता फेरीतील पहिल्या स्टेजमध्ये अव्वलस्थान पटकावत मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी दमदार सुरुवात केली. अभिषेक वर्मा आणि यशस्विनी जोडी 17 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनू आणि सौरभ या जोडीला पहिल्या स्टेजमध्ये टॉपला राहिल्याचा फायदा मिळेल असे वाटत होते. पण फायनल राउंडमध्ये ही जोडी सातव्या क्रमांकावर राहिली. (tokyo olympics 2020 day 5 live updates Mixed team shooting mens hockey badminton Boxing Sailing table tennis )

सेलिंग : पुरुषांची ईआर रेस 1 मध्ये वरुण ठक्कर आणि केसी गणपती जोडी अठराव्या स्थानावर

ऑलिम्पिक स्पर्धेत जुडो क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधत्व करणारी सुशीला देवी मायदेशात परतली. दिल्ली विमानतळावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले

नेमबाजी : 10 मीटर मिश्र एअर रायफल सांघिक इवेंटमध्ये निराशा, दिव्यांश सिंग पन्वर आणि इलावरिवन जोडी 12 व्या तर अंजूम मौदगील आणि दीपक कुमार 18 व्या स्थानावर

बॉक्सिंग : 67 किलो वजनी गटात लोविना बोरोगोहेन हिने उपांत्यपूर्व फेरीत 3-2 असा विजय नोंदवत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय

सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी ग्रुप एमध्ये तिसऱ्या स्थानावर राहिली, साखळी फेरीतील शेवटचा सामना त्यांनी जिंकला पण क्वार्टरफायनलपूर्वीच त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला.

बॅडमिंटन : पुरुष दुहेरीत सात्विक साईराजरांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी कसा खेळ करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

हॉकी पुरुष : स्पेनला 3-0 अशी मात देत भारतीय संघाने नोंदवला स्पर्धेतील दुसरा विजय

mदुसऱ्या क्वार्टरमधील दुसऱ्या गोलसह टीम इंडियाने पहिल्या हाफमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली.

हॉकी पुरुष : पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने घेतली 1-0 अशी आघाडी, सीमरनजितने डागला पहिला गोल

नेमबाजी : दमदार सुरुवातीनंतर मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडी पदकाच्या शर्यतीतून आउट, या जोडीला 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. (पदकाच्या शर्यतीत राहण्यासाठी फायनल राउंडमध्ये पहिल्या चारमध्ये येणे अपक्षित असते.)

हॉकीच्या मैदानात भारत आणि स्पेन यांच्यात लढत

पात्रता फेरीतील स्टेज 1 पार करुन 8 टीम दुसऱ्या स्टेजमध्ये पोहचल्या आहेत. यातील मनू भाकेर आणि सौरभ चौधरी ही भारताची जोडी टॉपर आहे.

मनू भाकेर आणि सौरभ चौधरी यांनी पाचव्या दिवसाची सुरुवात दमदार केलीय. पहिल्या स्टेजमध्ये ही जोडी टॉपला राहिली.

loading image
go to top