esakal | 'हे' आहेत Tokyo Olympics मध्ये खेळणारे सर्वाधिक लहान आणि वयस्कर खेळाडू
sakal

बोलून बातमी शोधा

japan Olympic

'हे' आहेत Tokyo Olympics मध्ये खेळणारे सर्वाधिक लहान आणि वयस्कर खेळाडू

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : जगभरातील क्रीडा प्रेमी नागरिकांसाठी महत्वाचा "उत्सव" समजल्या जाणाऱ्या ऑलीम्पिक खेळांसाठी (Tokyo Olympics 2020) काउन्ट डाऊन सुरु झालंय. यंदाच्या ऑलंपिक स्पर्धा जपान मधील टोकियो शहरात येत्या २३ जुलै पासून सुरु होतायत. सीरियाची 12 वर्षांची टेबल टेनिसची खेळाडू हेंड जाजा टोकियो ऑलिम्पिकमधील सर्वांत लहान खेळाडू असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या 66 वर्षे वयाच्या मॅरी हन्ना या सर्वांत वयस्कर खेळाडू असणार आहेत. मॅरी या तीन नातवांच्या आजी आहेत. या खेळामध्ये खेळणाऱ्या कदाचित त्या एकमात्र आजी असतील. मॅरी यांचं हे सहावं ऑलिम्पिक असणार आहे. त्या घोडेस्वारी करतात. ऑलिम्पिकमधील पहिल्या पदकाची त्यांना आशा आहे. ऑस्ट्रेलियाच्या 62 वर्षांच्या घोडेस्वार एंड्र्यू होय या टोकियोमधील सर्वाधिक वर्षे वयाचे पुरुष खेळाडू असतील. 1984 मध्ये लॉस एंजलिसच्या ऑलिम्पिकमध्ये खेळाणारे एंड्र्यू यांचं हे आठवं ऑलिम्पिक असेल. ते ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक वेळा ऑलिम्पिकमध्ये खेळणारे खेळाडू आहेत. (Tokyo Olympics 2020 Hend Zaza Youngest And Mary Hanna Will Be Oldest To Compete Olympic)

हेही वाचा: Olympics 2020 : गोल्डन गर्ल राही पदकाची दावेदार असण्यामागची 5 कारणं

भारताची अनुभवी नेमबाज असलेल्या तेजस्विनी सावंतने 14 व्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल गाठत टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्कं केलं होतं. ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणारी ती भारताची सर्वाधिक वयाची ऑलंपियन होणार आहे. वयाच्या 40 व्या वर्षी तिचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न सत्यात अवतरलंय. जागतिक स्पर्धेत भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन देणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. यापूर्वी दोन वेळा तेजस्विनीचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न भंगलं होतं. 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक आणि त्यानंतर दुसऱ्यांदा 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकसाठी तिचे प्रयत्न अपूरं पडलं. ज्या कोल्हापूरला कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी जागतिक दर्जाचा नेमबाज ही जन्माला येऊ शकतो, हा विचार तेजस्विनीने कोल्हापूरच्या मातीत रुजवला.

loading image