esakal | लोविनाचा पदकी पंच! भारताचे दुसरे पदक झाले निश्चित
sakal

बोलून बातमी शोधा

 Lovlina Borgohain

Olympics : लोविनाचा पदकी पंच! (VIDEO)

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या लोविना बोरोगोहेन हिने आपली दमदार कामगिरीतील सातत्य कायम ठेवत सेमीफायनल गाठलीये. तिसऱ्या लढतीत चीनी ताइपी चेन निएन चेन हिला पराभूत करत भारतीाचे दुसरे पदक निश्चित केले. लंडन ओलिम्पिकनंतर आता भारताला टोकियोमध्ये महिला बॉक्सिमध्ये पदक मिळणार आहे. लंडन ऑलिम्पिकमधील पदक विजेती मेरी कोम स्पर्धेतून आउट झाल्यानंतर भारताला दिलासा देणारी कामगिरी नवोदित बॉक्सरने करुन दाखवलीये.

बॉक्सिंगमध्ये महिला गटातील 69 किलो वजनी गटात पहिल्या लढतीत प्रतिस्पर्धीने माघार घेतल्यानंतर दुसऱ्या लढतीत तिने तिने जर्मनच्या तगड्या अनुभवी नेदिन एपेट्जला पराभवाचा धक्का देत क्वार्टर फायनल गाठली होती. 4 ऑगस्टला ती सेमीफायनलसाठी रिंगमध्ये उतरेल. तिच्यासमोर तुर्कीच्या वर्ल्ड नंबर वन Busenaz Surmeneli या तगड्या बॉक्सरचे आव्हान असेल. ( Tokyo Olympics 2020 indian Boxer Lovlina Borgohain Assured a Medal at Tokyo Faces World Number 1 semi final)

ऑलिम्पिक तिकीट मिळताच आसाममध्ये साजरा झाला होता जल्लोष

आसामच्या बॉक्सरला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यातील सायकल रॅली चांगलीच चर्चेत आली होती. ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी असलेल्या भारतीय बॉक्सिंग टीममध्ये ऑलिम्पिक तिकीट मिळवणारी लोविना ही भारताची पहिली बॉक्सर आहे. तसेच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी आसामची ती पहिलीच महिला आहे. तिने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवल्यानंतर आसाम सरकारने “गो फॉर ग्लोरी, लोविना” असा प्रचार करत तिला प्रोत्साहन दिले होते. तिला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व पक्ष 7 किमी रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

loading image
go to top