esakal | Hockey: विक्रमी खेळीसह वंदनाची वडिलांना श्रद्धांजली (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

Vandana Katariya

Hockey: विक्रमी खेळीसह वंदनाची वडिलांना श्रद्धांजली (VIDEO)

sakal_logo
By
सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला संघाने दमदार कामगिरीसह क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. पहिल्या तीन पराभवानंतर मिळालेले या यशात वंदना कटारियाचा मोठा वाटा आहे. फॉरवर्डला खेळणाऱ्या वंदनाने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात दणादण गोल करत खास विक्रम आपल्या नावे केला. ऑलिम्पिक स्पर्धेतील सामन्यात हॅटट्रिक नोंदवणारी ती पहिली भारतीय महिला ठरलीये.

तिच्या या धमाकेदार कामगिरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरुये. वंदनाच्या याच कामगिरीच्या जोरावर 'करो वा मरो' लढतीत भारतीय महिला संघाने विजय नोंदवला. भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळ दाखवला. यात वंदनाचा खेळ वंदनीय असाच होता. 1984 नंतर कोणत्याही भारतीयाला ऑलिम्पिक स्पर्धेत हॅटट्रिकची कमाल करता आलेली नव्हती.

हेही वाचा: चक दे इंडिया! 'राणी'च्या संघाला मिळाली 'महाराणी'ची साथ

वंदनाने ऐतिहासिक कामगिरी आपल्या दिवंगत वडिलांना समर्पित केलीये. वंदना ऑलिम्पिकच्या तयारीत असताना तिच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतरही तिने गावी न जाता टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला प्राधान्य दिले. हरिद्वारच्या रोशनाबाद येथील छोट्याशा गावातून भारतीय हॉकी संघात स्थान मिळवलेल्या वंदनाने जगातील मानाच्या स्पर्धेत केलेली कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे.

वंदना कटारियाचा जन्मा 15 एप्रिल 1992 मध्ये रोशनाबाद या छोट्याशा गावात झाला. 2006 मध्ये ज्यूनिअर आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून तिने खेळाला सुरुवात केली. 2013 मध्ये भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक गोल नोंदवत ती लक्षवेधी ठरली होती. जर्मनीमध्ये झालेल्या ज्यूनिअर महिला वर्ल्ड कपमध्ये वंदना कटारियाने कांस्य पदकाची कमाई केली. हॉकीच्या मैदानातील तिच्या आयुष्यातील हा एक टर्निंग पाँइटच ठरला.

हेही वाचा: Olympics : डेटिंग अन् प्रेमाची सेटिंग; पाहा ऑलिम्पियन कपल

ऐतिहासिक कामगिरी वडिलांना समर्पित!

ऑलिम्पिक स्पर्धेत हॅटट्रिकची किमया साधणाऱ्या वंदनाच्या घरी शनिवारचा दिवस आनंदोत्सवाचे वातावर आहे. दिमाखदार कामगिरीने लेकीने आपल्या दिवंगत वडिलांना श्रद्धांजली अर्पित केली, अशी भावना वंदनाची आई सौरण देवी यांनी व्यक्त केली. मे 2021 मध्ये वंदनाचे वडील नाहर सिंह यांचे निधन झाले होते. यावेळी वंदना ऑलिम्पिकसाठी बंगळुरु कॅम्पमध्ये तयारी करत होती. ऑलिम्पिकची तयारी करत असल्यामुळे तिला वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी येता आले नव्हते.

loading image
go to top