esakal | याला म्हणतात 'नेम'; रिटायरमेंटच्या वयात पटकावलं मेडल
sakal

बोलून बातमी शोधा

Abdullah Al-Rashidi

याला म्हणतात 'नेम'; रिटायरमेंटच्या वयात पटकावलं मेडल

sakal_logo
By
सुशांत जाधव

खेळाच्या मैदानात लक्षवेधी कामगिरी करुन अनेक जण वय फक्त आकडा असतो, याची झलक दाखवून देतात. कुवेतच्या अब्दुल्ला अलरशीदी (Abdullah Al-Rashidi) यांनी अशीच काहीसी कामगिरी केलीये. सातव्यांदा ऑलिम्पिक खेळणाऱ्या अब्दुल्ला रशीद यांनी रिटायरमेंटच्या वयात कांस्य पदक जिंकून दाखवलं. कहाणी इथ संपलेली नाही. हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अभी बाकी आहे म्हणत 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्डन कामगिरी नोंदवण्याचा इरदा या नेमबाजाने बोलून दाखवलाय. (Tokyo Olympics 2020 kuwaits abdullah al rashidi winning shooting olympic medal at the age of 58)

पुरुषांच्या स्कीट प्रकारामध्ये 58 वर्षीय अब्दुल्ला अलरशीदी यांनी कांस्य पदकाची कमाई केली. पदक जिंकल्यानंतर त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याच्या इराद्याने स्पर्धेत उतरेन, असा विश्वास व्यक्त केला. पुढील ऑलिम्पिक स्पर्धाही 2024 ला फ्रान्समधील पॅरिसमध्ये होणार आहे. यावेळी त्यांचे वय साठीच्या पार असेल. या वयातही ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करण्याचे स्वप्न बाळगून असून आपल्या खेळाबद्दल प्रचंड उत्साही असल्याचेच दिसते.

हेही वाचा: Tokyo Olympics Day 4 : 'चक दे इंडिया' चा बॅक टू बॅक फ्लॉप शो

कांस्य पदकाची कमाई केल्यानंतर ते म्हणाले की, मी आता 58 वर्षांचा आहे. सगळ्यात म्हातारा निशानेबाज असताना मिळवलेल्या यशामध्ये आनंदी आहे. पुढच्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरीच्या इराद्याने मैदानात उतरेन. पॅरिसमध्ये होणाऱ्या स्पर्धेत स्कीटसह ट्रॅप प्रकारातही खेळेन, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: ऑलिम्पिकच्या गर्दीत लक्षवेधी ठरलेल्या चानूला मिळणार खाकी वर्दी!

अलरशीदी यांनी 1996 मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्यांदा भाग घेतला होता. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही त्यांना कांस्य पदकाची कमाई केली होती. पण त्यावेळी ते कुवेतच्या राष्ट्रध्वजाखाली खेळताना दिसले नव्हते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने कुवेतवर घातलेल्या निर्बंधामुळे त्यांना देशाचे प्रतिनिधत्व करता आले नाही. रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीने आनंद दिला. पण राष्ट्रध्वज हाती नसल्यामुळे मान उंचावण्याचे धाडस केले नव्हते. देशाचे प्रतिनिधीत्व करताना मिळालेलं यश खूप मोठे आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

loading image
go to top