Olympics : बजरंगचा पराभव; तरीही पदकाची आस कायम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Olympics : बजरंगचा पराभव; तरीही पदकाची आस कायम!

Olympics : बजरंगचा पराभव; तरीही पदकाची आस कायम!

ऑलिम्पिकच्या शेवटच्या टप्प्यात शुक्रवारी भारतीय ताफ्यात 'कहीं खुशी कही गम' असे चित्र पाहायला मिळाले. कुस्तीमध्ये भारतीय मल्ल बजरंग पुनियाने दोन सामने जिंकत गोल्डच्या दिशेने वाटचाल केली. पण सेमीफायनमध्येच त्याचा प्रवास संपुष्टात आला. अजरबैजानचा वर्ल्ड चॅम्पियन अलीव हाजीनं एकतर्फी लढतीत बजरंगला मात देत फायनल गाठली. जरी बजरंग पुनियाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असला तरी कुस्तीमध्ये भारताच्या पदकाची आस कायम आहे. शनिवारी पुनिया ब्राँझ पदकासाठी मॅटवर उतरेल. दुसरीकडे अदिती अशोकने गोल्फने पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. याचाही उद्या निकाल आपल्यासमोर येईल.

भारतीय महिला हॉकी संघाला संघर्षमय लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. गत ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट ग्रेट ब्रिटनला महिला संघाने कडवी टक्कर दिली. पण कांस्य पदकाच्या लढतीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. महिला कुस्तीमध्ये सीमा बिस्लाचा प्रवास हा प्री क्वार्टर फायनलमध्येच संपुष्टात आलाय.

सेमीफायनलमध्ये अजरबैजानच्या वर्ल्ड चॅम्पियन अलीव हाजीकडून बजरंग पुनियाचा 12-5 असा पराभव, उद्या ब्राँझसाठी खेळणार

गोल्फ : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय गोल्फर अदिती अशोक (Aditi Ashok) ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. शुक्रवारी तिसरा राउंड संपल्यानंतर 23 वर्षीय गोल्फर दुसऱ्या स्थानावर होती.

क्वार्टर फायनलमध्ये पुनियानं इराणच्या मोर्टेझाला (Morteza Ghiasi) चितपट करत दिमाखात सेमीफायनल गाठलीये.

65 किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या एर्नाझर अकमतलीएव्ह याला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केलाय

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट ग्रेट ब्रिटनने कांस्य पदकाच्या लढतीत भारतीय महिला संघाला 4-3 असे पराभूत केले. 2 गोलने पिछाडीवर असलेल्या भारतीय महिला संघाने सामन्यात जबरदस्त कमबॅक केले. पण ग्रेट ब्रिटनने पुन्हा दमदार कमबॅक करत सामना 4-3 असा खिशात घालत ब्राँझ मेडलवर नाव कोरले.

बॅक टू बॅक पेनल्टी कॉर्नर, सविता पुनियाची चूक आणि ग्रेट ब्रिटनला आघाडी

तिसऱ्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनच्या नावे राहिला. एक गाल डागून त्यांनी 3-3 बरोबरी केली. या क्वार्टरमधील अखेरच्या क्षणाला भारतीय महिला संघाला एक पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली. पण याचे गोलमध्ये रुपांतरित करण्यात अपयश

32 व्या मिनिटाला पेनल्टी कोर्नरवर ग्रेट ब्रिटन संघाने सामन्यात पुन्हा बरोबरी साधलीये. ग्रेट ब्रिटनकडून होली पेर्ने-वेबने बरोबरीचा गोल केला. सामना 3-3 बरोबरीत

पहिल्या हाफमध्ये भारतीय महिला संघाकडे 3-2 अशी आघाडी

पहिल्या क्वार्टरमधील पिछाडीवरुन भारतीय महिला संघाने दुसऱ्या क्वार्टमध्ये 3 गोल डागत ग्रेट ब्रिटनविरुद्दच्या सामन्यात आघाडी घेतली. सामन्यातील 29 व्या मिनिटाला वंदना कटारियाने डागला तिसरा गोल

भारतीय संघाने चौथ्या पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करत ग्रेट ब्रिटन विरुद्धच्या सामन्यात 2-2 अशी बरोबरी केलीये. 26 व्या मिनिटाला गुरजीत कौरनेच दुसरा गोल डागला.

पेनल्टी कॉर्नरमध्ये भारतीय महिला संघाला यश; गुरजीत कौरनं नोंदवला पहिला गोल. या गोलसह भारताने सामन्यात

ग्रेट ब्रिटनच्या खेळाडूंचा आक्रमक खेळ, दुसऱ्या क्वार्टरमधील 24 व्या मिनिटाला दुसरा गोल

दुसऱ्या क्वार्टरमधील काही क्षणातच ग्रेट ब्रिटनने गोल डागला. सामन्यातील 16 व्या मिनिटात ग्रेट ब्रिटनने 1-0 आघाडी घेतली.

सुरुवातीच्या पाच मिनिटांच्या खेळात दोन्ही संघ बरोबरीचा खेळ करताना दिसले. त्यानंतर ग्रेट ब्रिटन संघाकडून सातत्याने आक्रमण केले. भारतीय संघ बचाव करताना दिसला. सविता पुनियाच्या उत्तम खेळामुळे पहिल्या क्वार्टरमधील खेळ गोलशून्य बरोबरीत.

ग्रेट ब्रिटनच्या संघाने पहिल्या क्वार्टमध्ये केलेली आक्रमणे सविता पुनियाने उत्तमरित्या रोखून दाखवलीये.

पहिल्या क्वार्टरमध्ये भातीय महिला संघ चांगली कामगिरी करताना दिसतोय

सेमी फायनलमध्ये अर्जेंटिना विरुद्ध भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पदक निश्चित करण्याची त्यांच्याकडे शेवटची संधी आहे.

क्वार्टर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 1-0 अशा फरकाने नमवत भारतीय महिलांनी आपल्यातील सर्वोत्तम कामगिरीची झलक दाखवून दिली.

साखळी सामन्यातील सलग तीन सामन्यातील पराभवानंतर दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंडला शह देत भारतीय महिला हॉकी संघाने बाद फेरीत प्रवेश केला.

ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतीय महिला संघाने यंदाच्या स्पर्धेत सर्वोच्च कामगिरी नोंदवलीये

Web Title: Tokyo Olympics 2020 Live Indian Womens Hockey Face Great Britain Wrestlers Bajrang Punia And Seema Bisla Also In Action Friday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top