Olympics : त्झू यिंगची 'ताइ'गिरी सिंधूचे गोल्डन स्वप्न भंगले

PV Sindhu
PV SindhuPTI

रिओ ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड नंबर वन ताइ त्झू यिंगने 21-18, 21-12 असे सरळ सेटमध्ये पराभूत करत फायनल गाठली. या पराभवामुळे सिंधूचे गोल्डन स्वप्न भंगले आहे. तरीही भारताच्या पदकाची आस अजूनही कायम आहे. पहिल्या सेमीफायनलमध्ये चेन युफाई (Chen Yufei) आणि बिंग जिआवो (Bing Jiao) या चीनी खेळाडूंमध्ये लढत झाली होती. यात चेन युफाई (Chen Yufei) ने बाजी मारली होती. या सामन्यात पराभूत बिंग जिआओ (Bing Jiao) हिच्याशी सिंधू आता कांस्य पदकासाठी लढेल. कांस्य पदकाची लढत उद्या (रविवारी) होणार आहे.

ताइ त्झू यिंग आणि पीव्ही सिंधू यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात ताइ त्झू यिंगचे रेकॉर्ड भारी होते. यात तिने 14-5 अशी आणखी सुधारणा केली. दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये उतरलेल्या ताइ त्झू यिंग हिने ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेशे केलाय. दुसरीकडे रौप्य पदक विजेत्या सिंधूचे सोनेरी स्वप्न भंगले असून आता कांस्य पदकासाठी ती चीनच्या ही बिंगझाओ हिच्या विरुद्ध लढेल. बिंगझाओ ही जागतिक क्रमवारीत 9 व्या स्थानावर आहे. एवढेच नाही तर ती पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या मैदानात उतरली आहे. त्यामुळे रौप्य पदक विजेत्या सिंधूचे पारडे या सामन्यात निश्चित जड असेल. दोघींच्यातील रेकॉर्ड देखील सिंधूच्या बाजूने आहे. सिंधूने 9- 5 अशी आघाडी आहे. याचा तिला कितपत फायदा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सिंधने एक पाइंट मिळवत स्कोअर 9-16 असा आणला पण त्यानंतर ताइने पुन्हा आगेकूच केली

सेटच्या सुरुवातीला आघाडी घेऊनही पीव्ही सिंधू एक-एक पाइंटसाठी संघर्ष करताना दिसतेय तकिने एका बाजूला तिच्या खात्यात 8 पाइंट्स असताना ताइने 15 पाइंट मिळवत सामन्यावर मजबूत पकड मिळवलीये

ताइ त्झू यिंग सातत्याने सिंधूवर दबाव टाकण्यात यशस्वी ठरताना दिसतेय

सिंधून पहिला सेट गमावला वर्ल्ड नंबर वन ताइ त्झू यिंगने मारली 21-18 अशी बाजी

जबरदस्त रॅलीनंतर ताइ त्झू यिंग हिने कमालीचा स्मॅश मारत साधली 17-17 अशी बरोबरी

दोघींकडून रॅली आणि चतुराईचा खेळ पाहायला मिळतोय

11-11 बरोबरीनंतर सिंधूने एका पाइंटसह आगेकूच केली थोड्याच वेळात ताइ त्झू यिंगने पुन्हा 12-12 अशी बरोबरी साधली

पहिल्या सेटपासून सिंधू दमदार खेळ करत आहे

सेमीफायनल : सिंधू विरुद्ध चायनीज तैपेईच्या ताइ त्झू यिंग (Tai Tzu Ying) यांच्यातील सामन्याला सुरुवात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com