esakal | Olympics 2020 : आखाड्यातील ढाण्या वाघाकडून गोल्डन कामगिरीची आस
sakal

बोलून बातमी शोधा

Bajrang Punia

Olympics 2020 : आखाड्यातील ढाण्या वाघाकडून गोल्डन कामगिरीची आस

sakal_logo
By
सुशांत जाधव

देशातील स्टार पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia) याच्याकडून ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics) पदकाची अपेक्षा आहे. तो पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या आखाड्यात उतरणार आहे. हरियाणाच्या या पठ्ठ्यानं आतापर्यंत ज्या ज्या स्पर्धेत भाग घेतलाय त्यात त्याने लक्षवेधी कामगिरी केलीये. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत. वयाच्या सातव्या वर्षांतच आखाड्यात पाऊल टाकणाऱ्या बजरंगकडून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकाची आस आहे. (Tokyo Olympics 2020 Medal Prediction Wrestler Bajrang Punia Hopes Of Gold Medal For India )

वर्ल्ड U-23 चॅम्पियनशिप, कॉमनवेल्थ गेम्स, आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियनशिप आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने पदक कमावली आहेत.

हेही वाचा: Olympics 2020 : गोल्डन गर्ल राही पदकाची दावेदार असण्यामागची 5 कारणं

सध्याची कामगिरी

मार्च 2021 मध्ये बजरंग पुनियाने रोम येथील माटेओ पेलिकोन रँकिंग सीरीजमध्ये मंगोलियाच्या तुल्गा तुमुर ओचिर याला पराभूत करत सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. 65 किलो वजनी गटातील जागतिक रँकिंगमध्ये तो अव्वलस्थानावर आहे. त्यामुळेच तो यंदाच्या स्पर्धेत गोल्डन कामगिरी करेल, असे वाटते.

आतापर्यंतच्या कामगिरीवर एक नजर

-रौप्य पदक- जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा, नूर-सुल्तान, 2019 (65 किलो वजनी गट)

-रौप्य पदक - जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा, बुडापेस्ट, 2018 (65 किलो वजनी गट)

-कांस्य पदक- जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा, हंगरी, 2013 (60 किलो वजनी गट)

रौप्य पदक- आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा, अल्माटी, 2021 (65 किलो वजनी गट)

-रौप्य पदक - आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा, नवी दिल्ली, 2020 (65 किलो वजनी गट)

- सुवर्ण पदक - आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा, शीआन, 2019 (65 किलो वजनी गट)

- कांस्य पदक - आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा, बिश्केक, 2018 (65 किलो वजनी गट)

-सुवर्ण पदक - आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा, नवी दिल्ली, 2017 (65 किलो वजनी गट)

- रौप्य पदक - आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा, अस्ताना, 2014 (61 किलो वजनी गट)

- कांस्य पदक - आशियाई कुस्ती अजिंक्य स्पर्धा, नवी दिल्ली, 2013 (60 किलो वजनी गट)

-सुवर्ण पदक - राष्ट्रकुल स्पर्धा गोल्ड कोस्ट, 2018 (65 किलो वजनी गट)

- रौप्य पदक - राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो, 2014 (61 किलो वजनी गट)

- सुवर्ण पदक - आशियाई क्रिडा स्पर्धा, जकार्ता, 2018 (65 किलो वजनी गट)

- रौप्य पदक - आशियाई क्रिडा स्पर्धा, इंचियोन, 2014 (61 किलो वजनी गट)

loading image