esakal | कोरोना निर्बंध; पाहा मीराबाई पदक स्वीकारताना काय घडलं (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

Mirabai Chanu

कोरोना निर्बंध; पाहा मीराबाई पदक स्वीकारताना काय घडलं (VIDEO)

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने (Mirabai Chanu wins Silver) अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले. रौप्य पदकाने भारताने यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात केलीये. 49 किलो वजनी गटात मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग प्रकारातील 21 वर्षांचा दुष्काळ संपवला. पदक वितरण समारंभावेळी खेळाडूंनी स्वत:चा आपल्या गळ्यात मेडल घातल्याचे पाहायला मिळाले. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काहीतरी घडत आहे. (tokyo olympics 2020 Mirabai Chanu Silver medals Watch video)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक समितीने विशेष नियमावली आखली आहे. त्यानुसार पदक विजेत्या खेळाडूला पदक स्वत:हून गळ्यात घालायचे आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) अध्यक्ष थॉमस बाक (Thomas Bach) यांनी पदक समारोहासंदर्भात बदल केल्याची घोषणा यापूर्वी केली होती.

त्यानुसार, पदक समारोहावेळी ट्रे मधून पदक विजेत्या खेळाडूसमोर आणण्यात आले. खेळाडूने स्वत: ते उचलून आपल्या गळ्यात घातले. टोकियो ऑलिम्पिकमधील मेडल सेरेमनीचा हा दुसरा इवेंट होता. यापूर्वी महिला गटातील 10 मीटर रायफल प्रकाराचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला होता. यातही चीनच्या यांग किन हिने गोल्ड मेडल मिळवले होते.

loading image
go to top