esakal | Tokyo Olympics Day 2 : 'कहीं खुशी कहीं गम'; दिवसभरात काय घडलं
sakal

बोलून बातमी शोधा

Tokyo Olympics Day 2

Tokyo Olympics Day 2 : 'कहीं खुशी कहीं गम'; दिवसभरात काय घडलं

sakal_logo
By
सुशांत जाधव

ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसरा दिवस भारतासाठी समिश्र राहिला. मीराबाई चानूनं रौप्य पदकाची कमाई करत वेटलिफ्टिंगमध्ये भारताची ताकद दाखवून दिली. दुसरीकडे तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव या जोडीला क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तिरंदाजीतील मिश्र टीम इवेंटमधील पदकाची आस संपुष्टात आली असली तरी महिला गटातून दीपिकाकडून लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. Tokyo Olympics Day 2 Mirabai Chanu Indias 1st Medal To Other Sport Event Updates

बॉक्सिंगमध्ये अनुभवी विकास कृष्णनला पराभवाचा धक्का

69 वजनी गटात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विकास कृष्णनचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आलाय. जपानच्या सेवोनरेट्स क्विंकी मेनसाह ओकाजावा याने त्याला 5-0 अशी एकतर्फी मात दिली.

टेनिसमध्ये सुमित नागलने दुसरी फेरी गाठली आहे. मागील 25 वर्षांत पहिल्यांदाच एखादा भारतीय टेनिसपटूने ऑलिम्पिकमध्ये एकेरी सामन्यात विजयी सलामी दिलीये. त्याचा पुढील सामन्यात मदवेदेवशी टक्कर होणार आहे.

टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा आणि सुतिर्था यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय.

बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि साईराज सात्विकसाईराज रंकीरेड्डी जोडीने विजयी सलामी दिली. या दोघांनी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या यांग-ची जोडीला 21-16, 16-21, 27-25 असे पराभूत करतर दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताचे खाते उघडले. तिने रौप्य पदकाची कमाई केली

नेमबाजीमध्ये 10 मीटर पिस्टल प्रकारात सौरभ चौधरी टॉपर ठरला. दुसरीकडे युवा नेमबाज अभिषक वर्माला फायनलमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.

पुरुष हॉकी संघाने अ गटातील आपल्या पहिल्या सान्यात न्यूझीलंडचा 3-2 असा धुव्वा उडवत विजयी सलामी दिलीये.

loading image
go to top