esakal | सिंधूची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधूची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

सिंधूची विजयी घौडदौड, उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक

sakal_logo
By
नामदेव कुंभार

Tokyo Olympics 2020 PV Sindhu : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत आणखी एका विजयाची नोंद केली. पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमधील महिला एकेरीमध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील सिंधूचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळत असून भारताची पदकाची आशा पल्लवीत झाली आहे. तिसऱ्या फेरीत सिंधूने डेन्मार्कच्या मिआ ब्लशफेल्ड हिचा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक मारली आहे.

जागतिक क्रमवारीत 12 व्या क्रमांकावर असणाऱ्या मिआ ब्लशफेल्ड हिचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. सिंधूने मिआ ब्लशफेल्ड हिच्यावर 21-15, 21-13 असा सरळ विजय मिळवला. सिंधूने क्रॉसकोर्ट स्मॅशचा पूरेपूर वापर करत प्रतिस्पर्धी खेळाडूवर दबावात टाकला. या विजयासह सिंधूने सुवर्णपदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

हेही वाचा: ठाकरे सरकारची बदनामी; एसटी कर्मचारी निलंबित

ग्रुप स्टेज मॅचमध्ये इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव केला होता. दुसऱ्या लढतीत हाँगकाँगच्या चेंग गँन यी हिचाही पराभव करत आपली घौडदौड कायम राखली होती. आता सिंधू उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली आहे. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील चॅम्पियन आणि रिओ ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकाची आपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागाल आहे. भारताच्या पदकाच्या आशा आता सिंधू हिच्यावर आहेत.

हेही वाचा: 'नारायण राणे आमचे नेते आहेत'; पाहा व्हिडिओ

loading image
go to top