Olympic : कमलप्रीतची फायनलमध्ये धडक, थाळीफेकमध्ये भारताला पदकाची आस

दुसऱ्याबाजूला कमलप्रीत जबरदस्त कामगिरी करत आहे. तिसऱ्या प्रयत्नात तिने ६४ मीटरपर्यंत थ्रो करुन अंतिम फेरीत स्थान पक्के केले.
Olympic : कमलप्रीतची फायनलमध्ये धडक, थाळीफेकमध्ये भारताला पदकाची आस

टोक्यो: टोक्यो ऑलिम्पिक (tokyo olympics) स्पर्धेचा आजचा नववा दिवस आहे. तिरंदाजी, (archery) बॉक्सिंगमध्ये निराशा झाली असली, तरी थाळीफेकमधून पदकाची आस कायम आहे. भारताच्या कमलप्रीत कौरने (Kamalpreet Kaur) थाळी फेकमध्ये (discus throw) जबरदस्त कामगिरी केली आहे. कमलप्रीतने थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. (tokyo olympics Kamalpreet Kaur reaches in final round of discus throw dmp82)

कमलप्रीत भारताला पदक मिळवून देण्याच्या जवळ पोहोचली आहे. तिरंदाजीत अतनु दास आणि बॉक्सर अमित पंघलचा पराभव झाला. दोघांना प्री-क्वार्टर फायनल फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तेच दुसऱ्याबाजूला कमलप्रीत जबरदस्त कामगिरी करत आहे. तिसऱ्या प्रयत्नात तिने ६४ मीटरपर्यंत थ्रो करुन अंतिम फेरीत स्थान पक्के केले.

Olympic : कमलप्रीतची फायनलमध्ये धडक, थाळीफेकमध्ये भारताला पदकाची आस
"...तर CM ठाकरेच नव्हे, PM मोदीही तुमच्याकडे येतील"

क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता फेरीत कमलप्रीतने दुसरे स्थान मिळवले. भारताचीच सीमा पुनियाला मात्र अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही. सीमा पुनिया ३१ स्पर्धकांमध्ये १६ व्या स्थानावर राहिली. अंतिम फेरी गाठण्यासाठी सीमाला टॉप १२ मध्ये स्थान मिळवणे आवश्यक होते. भारताच्या कमलप्रीत कौरने शानदार प्रदर्शन केले. तिने पहिल्या प्रयत्नात ६०.२९ मीटरपर्यंत थाळी फेकली. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात ६३.९७ मीटर अंतरापर्यंत थाळी फेकली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com