Olympics: 'गोल्डन' मॅन नीरजवर बक्षीसांची बरसात; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Golden-Man-Neeraj-Chopra

Olympics: 'गोल्डन' मॅन नीरजवर बक्षीसांची बरसात; वाचा सविस्तर

नीरजने भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलं.

Tokyo Olympics: टोकयो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेक (Men's Javelin) प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने इतिहास रचला. पात्रता फेरीत चमकदार कामगिर करणारा नीरज अंतिम फेरीत अधिकच निखरला. त्याने यंदाच्या स्पर्धेत भारतीयांसाठी सोनेरी आनंद मिळवून दिला. सर्वात लांब भालाफेक करत त्याने सुवर्णपदक पटकावले. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हे भारताचं पहिलंच सुवर्णपदक ठरलं. 2008 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने शूटिंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यानंतर वैयक्तिक खेळांमध्ये हे भारताचं दुसरं सुवर्णपदक ठरलं.

हरयाणाच्या नीरजवर सुवर्णकमाईनंतर शुभेच्छांची आणि बक्षीसांची लयलूट होताना दिसली. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. हरयाणा सरकारने आपल्या तर्फे ठरल्याप्रमाणे नीरजला ६ कोटींचा इनाम जाहीर केला. त्याशिवाय, हरयाणातील पंचकुला या मोठ्या शहरात एक अथलेटिक्स सेंटर उभारलं जाणार असून तेथील मुख्य अधिकारी म्हणून नीरज याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री खट्टर यांनी केली. तसेच, ठरल्याप्रमाणे त्याला ५० टक्के सूटीच्या दरात एक प्लॉटदेखील दिला जाईल असेही मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी स्पष्ट केले.

ब्राँझ मेडल विजेत्या बजरंग पुनियालाही इनाम आणि बरंच काही...

मूळचा हरयाणाचा असलेल्या बजरंग पुनियाने ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात ब्राँझपदक पटकावले. त्याने केवळ देशाचेच नव्हे तर हरयाणाचेही नाव जगात पोहोचवले. त्यामुळे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बजरंगसाठी इनाम जाहीर केला. बजरंग पुनियाने अप्रितम खेळ केला. त्याच्यामुळे हरयाणाचे नाव सर्त्र पोहोचले. त्यामुळे राज्य सरकारच्या योजनेनुसार, हरयाणा सरकारकडून बजरंग पुनियाला २.५० कोटींचे बक्षीस दिलं जाईल. त्यासोबतच सरकारी नोकरी देण्यात येईल. आणि हरयाणातील जमीन ५०टक्के सूटीच्या भावात त्याला विकत घेता येईल. तसेच, बजरंगचे मूळ गाव असलेल्या झझर जिल्ह्यातील खुंदन गावी एक इनडोअर स्टेडियमदेखील बांधण्यात येईल, अशी घोषणा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली.