esakal | Paralympics: सिंग इज किंग; तिरंदाजीत हरविंदरचा पदकी वेध!
sakal

बोलून बातमी शोधा

Harvinder Singh

Paralympics: सिंग इज किंग; तिरंदाजीत हरविंदरचा पदकी वेध!

sakal_logo
By
सुशांत जाधव

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा पदकी धडाका सुरुच आहे. तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने भारताच्या खात्यात आणखी एका पदाची भर घातलीये. कांस्य पदकाच्या लढतीत हरविंदर सिंगने कोरियाच्या खेळाडूला 6-5 अशा फरकाने पराभूत केले. या पदकासह भारताच्या खात्यात 13 पदकाची नोंद झाली आहे. 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 5 कांस्य पदकासह भारत पॅरालिंपिक गुणतालिकेत 37 व्या स्थानावर आहे.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील 10 वा दिवस भारतासाठी पुन्हा एकदा पदकाची अनुभूती देणारा ठरला. प्रवीण कुमारने उंच उडीतील टी-64 गटात रौप्य पदकाची कमाई केली. त्याच्याशिवाय अवनी लेखारा हिने नेमबाजीत कांस्य पदक पटकावले. तिने 50 मीटर रायफल P-3 एसएच-1 क्रीडा प्रकारात पदकी निशाणा साधला. यंदाच्या स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक कांस्य असा दुहेरी धमाका करुन तिने अनोखा पराक्रम आपल्या नावे केला.

loading image
go to top