esakal | Paralympics Closing Ceremony : अवनीनं थाटात फडकवला तिरंगा!
sakal

बोलून बातमी शोधा

Paralympics 2020 closing ceremony

Paralympics Closing Ceremony : अवनीनं थाटात फडकवला तिरंगा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

जपानची राजधानी टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेच्या सांगता समोराहोच्या कार्यक्रमात महिला नमेबाज अवनी लेखारा हिने भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली. अवनीने भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. याशिवाय तिने 50 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई देखील केली होती. एकाच स्पधेत दोन पदक मिळवण्याचा खास विक्रमही तिने आपल्या नावे केला होता. पॅरालिंपिक स्पर्धेत जिच्यामुळे 'जन गण मन..' पहिली धून वाजली तिने चेयरवर बसून मोठ्या थाटात तिंरगा फडकव्याचे पाहायला मिळाले.

पॅरालिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवलीये. अवनीच्या दोन पदकांसह भारताने एकूण 19 पदकांची कमाई केली. बॅडमिंटनमधील दोन, नेमबाजीतील दोन आणि भालाफेकमधील एक अशा पाच सुवर्ण पदकाचाही यात समावेश आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताकडून 54 खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधीत्व केले. त्यामुळेच भारताच्या पदकतालिकेत दुहेरी आकडा दिसेल अशी आस होती. ती अपेक्षा खेळाडूंनी सत्यात उतरवली आहे.

loading image
go to top