
सुमीतची कमाल! एकाच मॅचमध्ये तब्बल तीन वेळा मोडला विश्वविक्रम
Tokyo Paralympics: सुमीत अंतिलने भारताला मिळवून दिलं सुवर्णपदक
Tokyo Paralympics: स्पर्धेत पुरुष भालाफेक (Javelin Throw) स्पर्धेत भारताच्या सुमित अंतिलने (Sumit Antil) सुवर्णकमाई (Gold Medal) केली. सुमीतने ६८.५५ मीटर (meters) लांब भालाफेक करत विश्वविक्रम (World Record) रचला. ऑस्ट्रेलियाचा मीचॅल बरियन याने ६६.२९ मीटर लांब भालाफेक केली. त्याने स्पर्धेत रौप्यपदक कमावले. तर, श्रीलंकेचा दुलान कोडीथुवक्कू याने कांस्यपदकाची कमाई केली. महत्त्वाची बाब म्हणजे, सुमित अंतिलने या एका सामन्यात तब्बल तीन वेळा विश्वविक्रम मोडला.
F64 गटात सुमितने एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीन वेळा विश्वविक्रम मोडीत काढला. पहिल्या प्रयत्नात त्याने ६६.९५ मीटर लांब भालाफेक करत विश्वविक्रम मोडीत काढला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने ६८.०८ मीटर लांब भाला फेकला आणि स्वत:चाच आधीचा विश्वविक्रम मोडला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने ६५.२७ मीटर तर चौथ्या प्रयत्नात त्याने ६६.७१ मीटर लांब भाला फेकला. पाचव्या प्रयत्नात त्याने पुन्हा एकदा विश्वविक्रमी भालाफेक केली. त्याने चक्क ६८.५५ मीटर लांब भालाफेक केला आणि नवा विश्वविक्रम स्थापन केला. एकाच सामन्यात तब्बल तीन वेळा विश्वविक्रम मोडीत काढणारा सुमित हा पहिलाच भारतीय ठरला.
Web Title: Tokyo Paralympics Sumit Antil Breaks World Record 3 Times In Single Match Vjb
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..