IPL प्रेमापोटी ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडू पाकला ठेंगा दाखवणार?

Australian Players
Australian PlayersSakal

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान दौरा करण्यास तयारी दर्शवली आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ स्टार खेळाडूंसह पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याची तयारी करत आहे. पाकिस्तान दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसह तीन टी-20 आणि तेवढ्याच वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया मोठा दौऱ्यासाठी तयार झाल्यामुळे पाकिस्तानमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण या दौऱ्यात पाकला आता मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियातील प्रमुख खेळाडू (Australian Players) व्हाईट बॉल सामन्यातून माघार घेऊन आयपीएलला प्राधान्य देणार असल्याची चर्चा रंगत आहे. (Top Australian players likely to skip white ball Pakistan tour to join IPL 2022)

ऑस्ट्रेलिया (Australia)आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील मालिकेची सुरुवातही कसोटी मालिकेनं होणार आहे. 4 ते 25 मार्च या कालावधीत तीन कसोटी सामने खेळवण्यात येणार आहेत. या दौऱ्यातील व्हाईट बॉल क्रिकेट सामने हे 29 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान नियोजित आहेत. याच दरम्यान भारतात आयपीएलचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू पाकिस्तान दौऱ्यातील सामने सोडून भारतात दाखल होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

क्रिकबझ्झनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, करारबद्ध असणारा कोणताही खेळाडू 6 एप्रिलपूर्वी आयपीएलसाठी उपलब्ध नसेल. व्हाईट बॉल क्रिकेट संघात नसणाऱ्या खेळाडूंनाही हाच नियम लागू असेल, असे ते म्हणाले. फ्रेंचायझीच्या एका अधिकाऱ्याने मात्र ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू आयपीएलमध्ये येतील, असा दावा केला आहे. त्यामुळे पाकिस्तान दौऱ्यात ऑस्ट्रेलियन खेळाडू नेमकी काय भूमिका घेणार? पाकिस्तान दौरा अर्ध्यावर सोडून ते आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ऑस्ट्रेलियाचे हे खेळाडू आयपीएलमध्ये करारबद्ध

पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स), मॅथ्यू वेड (गुजरात टायटन्स), नाथन कूल्टर-नाइल (राजस्थान रॉयल्स), नाथन एलिस (पंजाब किंग्ज), रिले मेरेडिथ (मुंबई इंडियन्स) , सीन एबॉट (सनरायझर्स हैदराबाद), जेसन बेहरेनडॉर्फ (रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु), डेनियल सॅम्स (मुंबई इंडियन्स), जोश हेजलवुड (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु), मिशेल मार्श (दिल्ली कॅपिटल्स), डेविड वार्नर (दिल्ली) कॅपिटल्स), ग्लेन मॅक्सवेल (रिटेन, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) आणि मार्कस स्टोयनिस ( लखनऊ सुपर जायंट्स)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com