INDvsSA : आता येणार कसोटीतही मजा; रोहित म्हणजे दुसरा वीरुच

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

- सलामीवीर म्हणून रोहित शर्माचे पहिले अर्धशतक
- कसोटीतील 11 वे अर्धशतक
- भारताच्या पहिल्या दिवशी उपहाराला बिनबाद 91 धावा

विशाखापट्टणम : कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी उपहाराला बिनबाद 91 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करत पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकाविले. हे त्याचे सलामीवीर म्हणून पहिले अर्धशतक होते. 

रोहित शर्मा आज कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा अध्याय सुरु करत आहे आणि सलामीवीर म्हणून पदार्पणातच तो झळकला आहे. वीरेंद्र सेहवागसारखी आक्रमक शैलीच्या खेळीची त्याच्याकडून सारेच अपेभा करत होते. त्यानेही नेहमीप्रमाणे मैदानात पाऊल ठेवले आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. याचसह त्याने कसोटी कारर्किदीतील 11वे अर्धशतक साजरे केले. त्यानंतर ट्विटरवर त्याचे कौतुक करताना लोक थकत नव्हते. त्याचयावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twiiter erupts as Rohit Sharma scores half century in 1st innings as opener