विराट सारखंच द्विशतक त्यानंही केलंय; आता चौथ्या क्रमांकावर तोच हवा

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

एकीकडे रोहित शर्मा, मयांक अगरवाल, विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खोऱ्यानं धावा करत असताना तिकडं विजय हजारे करंडकात संजू सॅमसनेही द्विशतक झळकाविले आहे. त्यानंतर आता त्यालाच भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.  

नवी दिल्ली : एकीकडे रोहित शर्मा, मयांक अगरवाल, विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खोऱ्यानं धावा करत असताना तिकडं विजय हजारे करंडकात संजू सॅमसनेही द्विशतक झळकाविले आहे. त्यानंतर आता त्यालाच भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरु लागली आहे.  

त्याचा साष्टांग नमस्कार पाहून रोहितचाही तोल गेला

केरळकडून खेळताना त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या पहिल्या शतकाचे द्विशतकात रुपांतर केले. या द्विशतकासह तो भारतीय संघात गरज असलेल्या चौथ्या क्रमाकांसाठी प्रबळ उमेदवार बनत चालला आहे. 

प्रथम फलंदाजी करताना कोरळचा कर्धार रॉबिन उथप्पा चौथ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर संजू मैदानात आला. आधीच कमकूवत असलेल्या गोवाच्या  गोलंदाजीवर संजूने प्रहार केला. 

भारताचा फिरकीपटू हरभजनसिंगनेसुद्धा अशीच मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी केली होती. भारतीय संघात गेल्या अनेक दिवसांपासून चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळणार याची चर्चा सुरु आहे. चौथ्या क्रमांकावर गेले अनेक दिवस बऱ्याच खेळाडूंनी नशीब आजमावून पाहिले मात्र, यश कोणालाच आले आहे. अशातच भारताची माजी फिरकीपटू याने सूर्यकुमार यादवचा का विचार केला जात नाही म्हणत नाराजी व्यक्त केली होती. 

तो म्हणाला, ''देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करुनही सूर्यकुमार यादवला संघात स्थान का दिले जात नाही मला कळत नाही. सूय्रकुमार खूप मेहनत करत राहा, तुझाही नंबर लवकरच लागेल."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter erupts as Suryakumar yadav scores double century