Euro : जर्मनीचा स्वत:च्या पायावर घाव; फ्रान्सनं साधला डाव!

वर्ल्ड विजेत्या फ्रान्सची विजयी सुरुवात, जर्मनीला स्व: गोलामुळे करावा लागला पराभवाचा सामना
France vs Germany
France vs GermanyTwitter

UEFA EURO 2020, France vs Germany: डेथ ग्रुपमधील दुसऱ्या सामन्यात वर्ल्ड कप विजेत्या फ्रान्सने युरो कपमध्ये दबदबा असणाऱ्या जर्मनीला 1-0 असे पराभूत करत स्पर्धेत दिमाखदार सुरुवात केली. म्यूनिखच्या फुटबॉल अरेना स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये 20 व्या मिनिटाला जर्मनीचा डिफेंडर मॅट्स हम्मेल्सच्या स्व गोलामुळे फ्रान्सला 1-0 अशी आघाडी मिळाली. फ्रान्सच्या हेर्नांडिजने पास केलेला चेंडू गोलपोस्टपासून दूर ठेवण्याचा हम्मेल्सचा प्रयत्न फसला आणि जर्मनीची गत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी झाली. हा गोलच जर्मनीला महागात पडला. यामुळे युरोच्या आतापर्यंतच्या इतिहासात जर्मनीवर पहिल्यांदाच सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची वेळ आली. यंदाच्या स्पर्धेतील आतापर्यंत झालेल्या लढतीती हा तिसरा आत्मघातकी गोल ठरला. (UEFA EURO 2020 France win 1-0 own goal by the Germany defender Mats Hummels)

पहिल्या हाफमध्ये जर्मनीच्या ताफ्यातील खेळाडूमुळे मिळालेली आघाडी फ्रान्सने शेवटपर्यंत कायम ठेवली. दरम्यान फ्रान्सचे दोन गोल डागल्याचेही पाहायला मिळाले. पण ऑफ साइडमुळे रेफ्रीने ते गोल रद्द केले. फ्रान्सच्या तुलनेत जर्मनीचा खेळ हा भारी होता. 62 टक्के बॉल आपल्या नियंत्रणात ठेवणाऱ्या जर्मनीने 10 पैकी एकच शॉट्स ऑन टार्गेट मारता आला. याउलट फ्रान्सने त्यांच्यापेक्षा कमी म्हणजेच 38 टक्के बॉलवर नियंत्रण ठेवले. यात त्यांनी 4 पैकी त्यांनी एकच ऑन शॉट्स मारला.

France vs Germany
अखेरच्या क्षणी रोनाल्डोचा डबल बार; पोर्तुगालचा 3-० असा विजय

फ्रान्सने 1984 आणि 2000 मध्ये युरो कप स्पर्धा जिंकली आहे. तर जर्मनीने सर्वाधिक 6 वेळा फायनल गाठताना 1972, 1980 आणि 1996 असे सर्वाधिक तीन वेळा युरो स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. F ग्रुपमध्ये या दोन संघाशिवाय पोर्तुगाल आणि हंगेरी हे संघ आहेत. तगडे संघ या ग्रुपमध्ये असल्यामुळे या गटाला डेथ ग्रुप संबोधण्यात मानले जाते. या ग्रुपमधील पहिल्या सामन्यात रोनाल्डोच्या पोर्तुगालने हंगेरीला 3-0 गोल डागून पराभूत केल्याने ते या ग्रुपमध्ये टॉपला आहेत. तर फ्रान्स 1-0 अशा विजयाने दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. 2016 च्या युरो कप स्पर्धेत जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात सेमीफायनल झाली होती. यावेळी फ्रान्सने जर्मनीला 2-0 असे पराभूत केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com