टीम इंडियातील खेळाडू फॅमिलीसह इंग्लंड दौऱ्यावर जाणार

फॅमिलीसोबत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा खेळाडूंचा मार्ग मोकळा झालाय.
 R Ashwin and Prithi Ashwin
R Ashwin and Prithi AshwinTwitter

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज असलेल्या भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना कुटुंबियांना सोबत नेण्याची परवानगी मिळाली आहे. इंग्लंड सरकारने बीसीसीआयने केलेली मागणी मान्य केली असून फॅमिलीसोबत इंग्लंड दौऱ्यावर जाण्याचा खेळाडूंचा मार्ग मोकळा झालाय. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 18 ते 22 जून दरम्यान आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान असेल.

 R Ashwin and Prithi Ashwin
क्वारंटाईन संपताच कमिन्स पडला गर्लफ्रेंडच्या गळ्यात (VIDEO)

याशिवाय भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. दुसरीकडे भारतीय महिला संघ एका कसोटी सामन्यासह वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू मुंबईत क्वारंटाईन प्रक्रिया पूर्ण करत आहेत. काही खेळाडूंच्यासोबत त्यांची फॅमिली मेंबर्सही क्वारंटाईनमध्येच आहेत.

भारतीय पुरुष आणि महिला संघातील सदस्य चार्टर्ड फ्लाइटने इंग्लंडला रवाना होणार आहेत. याच फ्लाईटमधून खेळाडूंच्या कुटुंबियही जाण्याची शक्यता आहे. 3 जूनला टीम इंडिया लंडनमध्ये दाखल होईल. त्यानंतर विराटच्या नेतृत्वाखालील संघ साउथहॅम्टनच्या दिशेने जाईल. याच मैदानात ते न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहेत. टीम इंडियाला 10 दिवस क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. खेळाडूंसोबत जाणाऱ्या त्यांच्या फॅमिली मेंबर्संना देखील कोरोनाच्या प्रोटॉकॉलचे पालन करावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com