पाकिस्तानच्या खेळाडूनेच दिली मला फिक्सिंगची ऑफर; अकमलचा खुलासा

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सध्या कॅनडामध्ये सुरु असलेल्या ग्लोबल टी20 लीगमध्ये पाकिस्तानचा माजी फलंदाज उमर अकमल याला पाकिस्तानच्याच माजी क्रिकेटपटूने फिक्सिंग करण्याची ऑफर दिल्याचा खुलासा त्याने केला आहे. 

टोरंटो : सध्या कॅनडामध्ये सुरु असलेल्या ग्लोबल टी20 लीगमध्ये पाकिस्तानचा माजी फलंदाज उमर अकमल याला पाकिस्तानच्याच माजी क्रिकेटपटूने फिक्सिंग करण्याची ऑफर दिल्याचा खुलासा त्याने केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मन्सूर अख्तरने अकमलला ग्लोबल टी20 स्पर्धेतील सामन्यात फिक्सिंग करण्याची ऑफर दिली. 

अकमलने पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि ग्लोबल टी20 लीग प्रशासनाला याबाबत कल्पना दिली आहे. अकमलने 1980 ते 1990 या काळात पाकिस्तानसाठी 19 कसोटी सामने आणि 41 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 

ग्लोबल टी20 लीगच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सर्व खेळाडूंना भारतातील क्रिश नामक व्यक्ती आणि मन्सूर अख्तर यांच्यापासून लांब राहण्यास सांगितले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umar Akmal approached by former Test cricketer for fixing during Global T20 Canada