
U-19 Asia Cup: पंच कोरोना पॉझिटिव्ह, सामना अर्ध्यात थांबवला
संयुक्त अरब अमिरातीमध्ये १९ वर्षाखालील आशिया कपचे (Under-19 Asia Cup) आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील निम्मे सामने यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता स्पर्धेला कोरोनाचे (Corona) ग्रहण लागले. 19 वर्षाखालील आशिया कपमधील बांगलादेश आणि श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) यांच्यातील सामना एक पंच (Umpire) कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याने ३२ षटकांचा खेळ झाल्यानंतर स्थगित करण्यात आला. ज्यावेळी सामना थांबवण्यात आला त्यावेळी बांगलादेशने ३२.४ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १३० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर खेळाडूंनी मैदान सोडले.
आशिया क्रिकेट काऊन्सिलने (Asia Cricket Council) 'आशिया क्रिकेट काऊन्सिल आणि अमिराती क्रिकेट बोर्ड यांनी १९ वर्षाखालील आशिया कपमधील ब गटातील अंतिम सामना रद्द करण्यात आला आहे.' असे ट्विट केले. याचबरोबर त्यांनी 'दोन्ही पंचांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह (Corona Positive) आली आहे. सध्या हे दोन्ही पंच सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर स्पर्धेतील प्रोटोकॉलनुसार उपचार सुरु आहेत. या सामन्यातील सर्व व्यक्तींची चाचणी झाली आहे आणि चाचणीचा अहवाल येईपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवण्यात येईल. याबाबतची अधिकची माहिती विशेषकरुन सेमी फायनल सामन्याबद्दलची माहिती येत्या काळात दिली जाईल.' अशी माहिती दिली.
हेही वाचा: SA vs IND: शमी ठरतोय कपिल पाजींपेक्षाही भारी; पाहा आकडेवारी
दरम्यान, बांगलादेश क्रिकेट असोसिएशनचे सीईओ निझामुद्दीन चौधरी यांनी बांगलादेश संघाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'आम्हाला सामन्याचे पंच कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सामना सुरु झाल्यानंतर कळाले. आमच्या संघातील कोणी पॉझिटिव्ह नाही.'
34 षटकापर्यंत झालेला सामना रद्द झाल्यानंतर बांगलादेशचा संघ चांगल्या धावगतीमुळे सेमी फायनलमध्ये भारताबरोबर खेळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात पाकिस्तान श्रीलंकेबरोबर खेळेल. हे दोन्ही सामने ३० डिसेंबरला होतील आणि 31 डिसेंबरला दुबईत अंतिम सामना होईल.
हेही वाचा: वॉर्नरला अॅशेस राखल्यानंतर आता भारतात करायचीये 'ही' कामगिरी
19 वर्षाखालील वर्ल्डकपचे (U-19 World Cup) आयोजन वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे. या वर्ल्डकप जानेवारीच्या मध्यावर होणार आहे. बांगलादेशने गेल्या वर्षाची १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकला होता.
Web Title: Under 19 Asia Cup Bangladesh Vs Sri Lanka Match Stopped After Umpires Tested Corona Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..