
अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती संघटनेवरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. तब्बल १५ महिन्यांनंतर निलंबन मागे घेण्यात आले. यामुळे आता देशांतर्गत स्पर्धा आयोजनाचा व आंतरराष्ट्रीय स्पर्धा निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अम्मानमध्ये होत असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड चाचणीही आता घेता येणार आहे.