Copa America Qualifiers : उरुग्वेची उपांत्य फेरीत धडक! ब्राझीलचे आव्हान संपुष्टात

उरुग्वे-ब्राझील या दक्षिण अमेरिकेतील दोन बलाढ्य देशांमध्ये कोपा अमेरिका या फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी खेळवण्यात आली.
Uruguay beat Brazil on penalties to reach Copa America semi-finals
Uruguay beat Brazil on penalties to reach Copa America semi-finals sakal

Copa America Qualifiers : उरुग्वे-ब्राझील या दक्षिण अमेरिकेतील दोन बलाढ्य देशांमध्ये कोपा अमेरिका या फुटबॉल स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी खेळवण्यात आली. दोन देशांमधील या लढतीत ४१ फाऊल (चुका) झाले. चार फटके टार्गेटच्या दिशेने मारण्यात आले. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करता आले नाहीत. याच पार्श्वभूमीवर या लढतीच्या निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला.

उरुग्वेचा गोलरक्षक सर्जियो रोचे याने यामध्ये भन्नाट कामगिरी केली. ब्राझीलचा गोलरक्षक एलिसन बेकर याला ठसा उमटवता आला नाही. उरुग्वेने या लढतीत ४-२ अशी बाजी मारली आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता अंतिम चार फेरीमध्ये उरुग्वेसमोर कोलंबियाचे आव्हान असणार आहे.

ब्राझील - उरुग्वे यांच्यामधील लढत दोन्ही खेळाडूंमध्ये उग्र खेळ पाहायला मिळाला. ७४व्या मिनिटाला नाहितान एनडेझ याला रेफ्रींकडून लाल कार्ड दाखवण्यात आले. ब्राझीलच्या रॉड्रिगो याच्याशी झटापट केल्यामुळे एनडेझ याला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे अखेरच्या २१ मिनिटांमध्ये उरुग्वेला १० खेळाडूंसह खेळावे लागले; तरीही ब्राझीलला गोल करता आला नाही.

पेनल्टी शूटआऊटची रंगत

ब्राझील - उरुग्वे यांच्यामधील लढतीत पेनल्टी शूटआऊटमध्ये सर्जियो रोचे या गोलरक्षकाने छान कामगिरी केली. त्याने पहिल्या तीन शॉटनंतर एडर मिलिटाओ व डगलस लुईस यांचे आव्हान परतवून लावले. उरुग्वेकडून पहिल्या तीन प्रयत्नात फेडरिको वालवर्दे, रॉड्रिगो कोलमन व जियॉजियन बेनेडेटी यांनी गोल करीत ब्राझीलवर ३-१ अशी आघाडी मिळवली.

ब्राझीलकडून आंद्रेस पेरेरा याने एकमेव गोल केला. त्यानंतर ब्राझीलचा गोलरक्षक एलिसन बेकर याने जॉस गिमनेझ याचा फुटबॉल अडवून ब्राझीलचे आव्हान कायम ठेवले. ग्रॅबियल मार्टिनेली याने ब्राझीलसाठी गोल करीत ३-२ अशी आघाडी कमी केली. पण उरुग्वेच्या मॅन्यूएल उगार्टे याने गोल करीत दमदार विजय मिळवून दिला.

कॅनडाला संधी

अर्जेंटिना, कॅनडा, उरुग्वे व कोलंबिया या चार देशांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अर्जेंटिना २०२१मध्ये या स्पर्धेत अखेरचे जेतेपद पटकावले. उरुग्वेने २०११मध्ये अजिंक्यपद पटकावले. तसेच कोलंबियाने २००१मध्ये ही स्पर्धा जिंकण्याची किमया साधली. मात्र कॅनडाने ही स्पर्धा अद्याप एकदाही जिंकलेली नाही. यंदा त्यांना उत्तम संधी उपलब्ध झाली आहे; पण जेतेपदाच्या लढतीआधी त्यांना लिओनेल मेस्सीच्या अर्जेंटिनाचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे.

उपांत्य फेरीच्या लढती

अर्जेंटिना - कॅनडा, ९ जुलै

उरुग्वे - कोलंबिया, १० जुलै

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com