
न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का बसला. १३व्या मानांकित रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याला पहिल्याच फेरीमध्ये फ्रान्सच्या बेंजामिन बोंझी याच्याकडून पाच सेटच्या झुंजीनंतर पराभवाचा सामना करावा लागला.